जिल्हा परिषद बदली प्रक्रियेवर हरकतीचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:06+5:302021-08-01T04:13:06+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. ...
अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे या कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी धाव घेतली आहे.
२६ ते २८ असे तीन दिवस प्रशासनाकडून १० विभागातील २७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती बदल्याचा यात समावेश होता. यातील ५० कर्मचारी हे नाराज असल्याने त्यांनी त्यावर हरकती नोंदविल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत गठित करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे या तक्रारी दाखल केल्या आहेत. ३० जुलैपर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदने दिलीत. आजार, कौटुंबिक कारण, अशंत: बदल करून देण्यासह विविध कारणे दाखल हरकतीत नमूद आहेत. त्यामुळे प्रशासनाची आता कसरत लागणार आहे.
बॉक्स
विभागनिहाय दाखल हरकती
पंचायत ६, आरोग्य २३, पशुसंवर्धन २, बांधकाम १, महिला व बालकल्याण १ शिक्षण विभाग ८, सामान्य प्रशासन ९ याप्रमाणे तक्रार निवारण समितीकडे हरकती दाखल केल्या आहेत.
कोट
बदली प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली आली निवेदनांची पडताळणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केली जाणार आहे.
- तुकाराम टेकाळे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रशासन