खेड येथील महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:39+5:302021-06-03T04:10:39+5:30

मोर्शी : नजीकच्या खेड येथील अतिक्रमणधारकांनी महिला सरपंच व उपसरपंच यांना अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावात संतापाची लाट ...

Obscene insults to women sarpanches in Khed | खेड येथील महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ

खेड येथील महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ

Next

मोर्शी : नजीकच्या खेड येथील अतिक्रमणधारकांनी महिला सरपंच व उपसरपंच यांना अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावात संतापाची लाट ऊसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरल्या जात आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल नोंदवून अटक करण्यात आली.

मोर्शी तालुक्यातील खेड येथील स्वतःच्या मालकीचे घर असतानासुद्धा विलास महादेवराव सूर्यकार (५५) व अविनाश महादेवराव सूर्यकार (५२) यांनी ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर १२ ते १५ वर्षांपासून घर व गुरांचा गोठा बांधून अतिक्रमण केले. या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे गावात पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या दोन विहिरी आहेत. दोन वर्षांपूर्वी तेथे तार कंपाउंडचा प्रस्ताव मंजूर झाला होता. यावेळी मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी बरखास्त झाल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तार कंपाउंडची कामे होऊ शकली नाही. मात्र, आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नवीन बॉडी सत्तेत आली. सरपंच, उपसरपंचपदी महिलांची वर्णी लागली. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी भोवतालच्या खुल्या जागेवर तारेचे कंपाऊंड घालण्याच्या दृष्टिकोनातून या अतिक्रमणधारकांना सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून अतिक्रमण स्वतः काढण्यात यावे. अशा दोन ते तीन नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढले नाही. या ठिकाणी तार कंपाउंडचे काम करण्यास गेलेल्या ठेकेदारांना व काम करणाऱ्या मजुरांना या दोघांनी अरेरावी करून मारहाण केली. शेवटी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक मांडे, ग्रामसदस्य सुनील गावंडे, दीपक सोनी, सुनील चरपे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करताच विलास सूर्यकार व अविनाश सूर्यकार यांनी महिला सरपंच व उपसरपंच यांच्या अंगावर धाऊन त्यांना अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याने गावात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, सचिव व सदस्य यांनी मोर्शी पोलिसांत तक्रारी दिली. त्या अनुषंगाने मोर्शी पोलिसांनी तपास करून महिला सरपंच, उपसरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी विलास सूर्यकार व अविनाश सूर्यकार यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. महिला सरपंच व उपसरपंच यांना अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली.

बॉक्स

अतिक्रमणधारकांना वारंवार अतिक्रमण काढून घेण्याविषयीच्या नोटीस बजावली गेली. मात्र अतिक्रमण काढले नाही. तेथील विहिरीतून पाइपलाइनद्वारे गावात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून विहिरीच्या आजूबाजूला तार कंपाउंड करणे आवश्यक आहे. सदर अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, असे सरपंच कल्याणी प्रीतम राजस यांनी सांगितले.

Web Title: Obscene insults to women sarpanches in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.