अडते, खरेदीदारांकडून मागितले विवरण
By admin | Published: June 3, 2017 12:06 AM2017-06-03T00:06:00+5:302017-06-03T00:06:00+5:30
मागील वर्षी जिल्ह्याच्या उत्पादकतेपेक्षा पाच लाख क्विंटल तुरीची खरेदी होत असल्याने ही तूर आली कुठून, हा प्रश्न "लोकमत"ने जनदरबारात लावून धरला.
जिल्हा उपनिबंधकांची माहिती : उत्पादनापेक्षा अधिक तुरीची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील वर्षी जिल्ह्याच्या उत्पादकतेपेक्षा पाच लाख क्विंटल तुरीची खरेदी होत असल्याने ही तूर आली कुठून, हा प्रश्न "लोकमत"ने जनदरबारात लावून धरला. याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या हंगामात अडत्यांनी ज्यांच्या मालाचा लिलाव केला ती माहिती व ज्या व्यापाऱ्यांनी तूर खरेदी केली त्याची विल्हेवाट कुठे लावली, ते सर्व विवरण मागविले आहे. कृषी अधीक्षक कार्यालयास उत्पादकतेचा तपशील माहविला आहे. याव्दारे उत्पादकतेपेक्षा अधिक तुरीचा शोध घेतला जाणार आहे.
यंदा बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत १८ लाख क्विंटल शासकीय व व्यापाऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. अजून शेतकऱ्यांची ५.३१ लाख क्विंटल तूर खरेदी व मोजणी व्हावयाची आहे. कृषी विभागाने विशद केल्याप्रमाने जिल्ह्यात १.३४ लाख हेक्टर क्षेत्रात ११.५६ क्विंटल प्रतीहेक्टर या उत्पादकते प्रमाने किमान १५.५४ लाख क्विंटल उत्पादन व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात यापेक्षा पाच ते सहा लाख क्विंटल तुरीचे व्यवहार होत असल्याने, ही तूर आली कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. ही परप्रांतातून आली का, किंवा व्यापाऱ्यांनीच कमी भावात शेतकऱ्याजवळून खरेदी करून अन्य नावाने शासकीय खरेदी केंद्रावर विकली काय? किंवा कृषी विभागाचा उत्पादकतेचा अहवाल खोटा आहे का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. आता मात्रता वाढ२ीव तुरीचा शोध घेतला जाणार आहे.
जिल्ह्याच्या उत्पादकतेविषयीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे मागविण्यात आला आहे. अडते व खरेदीदारांनी तूर कोणाजवळून घेतली ,या तुरीची विल्हेवाट कुठे लावली, याचे विवरण बाजार समित्यांकडून मागविले आहे.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक.