पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:34+5:302021-07-14T04:15:34+5:30

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार ३२३ झालेली आहे तर मृत्यू १,५५८ झालेले आहे. यामध्ये दर ३० नागरिकांमागे एक व्यक्ती ...

Obstruction of vaccination due to lack of supply | पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

Next

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९६ हजार ३२३ झालेली आहे तर मृत्यू १,५५८ झालेले आहे. यामध्ये दर ३० नागरिकांमागे एक व्यक्ती कोरोनाग्रस्त झालेला असल्याचे वास्तव आहे. अशावेळी कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. मात्र, यात पुरवठ्याचा खोडा आहे. जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आतापर्यंत अर्धाच लसींचा साठा मिळाल्याने ही मोहीम नियमित राहत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली व पाच टप्प्यांमध्ये लसीकरण होत आहे. आतापर्यंत ७,८९,३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत ६,९६,८४० डोस प्राप्त झालेले आहेत. यात ५,४१,३३० कोविशिल्ड, तर १,५५,५१० कोव्हॅक्सिनचा समावेश आाहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत साधारणपणे ११० लसीकरण केंद्र असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. यात शहरात १९ केंद्र आहेत. मात्र, लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने त्यापैकी कित्येक केंद्र बंद राहत आहे. त्यामुळे केंद्रांवर सकाळपासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

तालुकानिहाय झालेले लसीकरण (११ जुलैची स्थिती)

तालुका झालेले लसीकरण टक्केवारी

अचलपूर ४३,१३० १४.१६

अमरावती २,९२,६९२ ३२.८५

अंजनगाव सुर्जी ३०,२१४ १७.७०

भातकुली ३७२८३ ३१.९३

चांदूर बाजार ३३,६०८ १६.६४

चांदूर रेल्वे २२,१९४ २१.६०

चिखलदरा ९,७२६ ६.९२

दर्यापूर ३७,६२९ २०.१२

मोर्शी ३०,०११ १५.५३

नांदगाव खं २४,४८३ १५.३६

तिवसा २९,२४२ २६.३६

वरुड ५९,९९८ २५.२२

एकूण ७,०६,०१३ २२.२४

बॉक्स

लसीकरणात पुरुषच आघाडीवर

रविवारपर्यत झालेल्या लसीकरणात पुरुषच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामध्ये ३,७६,१६८ पुरुष व ३,२९,७७० महिलांचे लसीकरण झालेले आहे. याशिवाय ७५ तृतीय पंथीयांचे लसीकरण झालेले आहे. अमरावती शहरात १,५६,९१४ पुरुष व १,३५,७५० महिला, वरूड तालुक्यात ३१,३४० पुरुष व २८,६५२३ महिलांचे लसीकरण झालेले आहे.

बॉक्स

असे आहे टप्पानिहाय लसीकरण

जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर ३५,४६६, फ्रंटलाईन वर्कर ५६,१६२, याशिवाय १८ ते ४४ वयोगटात १,१८,५८१, ४५ ते ५९ वयोगटात २,४२,४२४ व ६० वर्षांवरील २,५५,१६२ ज्येष्ठ नागरिकांमध्ये आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. लसींचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने अमरावती, अचलपूर व वरूड तालुक्यातील केंद्रांवर पहाटेपासून रांगा असल्याचे चित्र आहे.

पाईंटर

आतापर्यंत झालेले लसीकरण : ७,०७,७९५

पहिला डोस : ५,२७,९८७

दुसरा डोज :१,७९,८०८

पाईंटर

आतापर्यत प्राप्त लसी : ६,९६,८४०

कोविशिल्ड : ५,४१,३३०

कोव्हक्सिन : १,५५,५१०

Web Title: Obstruction of vaccination due to lack of supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.