सालबर्डी येथे भाविकांचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:48+5:30

सालबर्डी येथील भुयारातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारपासूनच भाविकांनी मोर्शी व तेथून सालबर्डी गाठले. भाविक रात्रीपासूनच भुयाराच्या रस्त्याने मार्गक्रमण करीत होते. सकाळी सात वाजता भुयारानजीक भाविकांची रांग जवळपास अर्धा किलोमीटर असल्याने काहींना स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन न घेता परतावे लागले. या तीर्थस्थळी विविध देवालये असून, प्रामुख्याने सीतेची न्हाणी, ........

Ocean of devotees at Salbardi | सालबर्डी येथे भाविकांचा महासागर

सालबर्डी येथे भाविकांचा महासागर

googlenewsNext
ठळक मुद्देहजारो भक्तांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : येथून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्री पर्वावर दोन्ही राज्यांतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांच्या रांगा दिवसभर या निसर्गरम्य तीर्थस्थळी लागल्या होत्या.
सालबर्डी येथील भुयारातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारपासूनच भाविकांनी मोर्शी व तेथून सालबर्डी गाठले. भाविक रात्रीपासूनच भुयाराच्या रस्त्याने मार्गक्रमण करीत होते. सकाळी सात वाजता भुयारानजीक भाविकांची रांग जवळपास अर्धा किलोमीटर असल्याने काहींना स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन न घेता परतावे लागले. या तीर्थस्थळी विविध देवालये असून, प्रामुख्याने सीतेची न्हाणी, घोड्याची पाग, मुक्तादेवी मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, तुकडोजी महाराज आश्रम, बुद्धविहार तसेच पांडव कचेरी आहे. या ठिकाणी फेरफटकाही भाविकांनी मारला. गंगा आणि माडू नदीचा संगमावर भाविकांनी अंघोळ केली. येथील यात्रा ही एक आठवड्याची असून, महाशिवरात्रीची एकादशी व द्वादशी या दिवसांचे महत्त्व अधिक आहे.
दरम्यान, सालबर्डीला येणाऱ्या भाविकांसाठी मोर्शी तालुक्यातील सामाजिक संघटना तसेच भाविकांनी स्वयंस्फूर्तीने विनामूल्य फराळ, सरबत, पाणी वाटप केले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संस्थानच्या विश्वस्त मंडळाने चोख व्यवस्था केली. दोन्ही राज्यांतील पोलिसांचा येथे बंदोबस्त लागला आहे.

Web Title: Ocean of devotees at Salbardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.