शहर ‘ओडीएफ’ची स्वप्नपूर्ती!

By admin | Published: July 2, 2017 12:10 AM2017-07-02T00:10:45+5:302017-07-02T00:10:45+5:30

१७ हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाची उभारणी,

ODF dream of city! | शहर ‘ओडीएफ’ची स्वप्नपूर्ती!

शहर ‘ओडीएफ’ची स्वप्नपूर्ती!

Next

महापालिकेचे सकारात्मक प्रयत्न : क्युसीआयच्या तपासणीनंतर अंतिम शिक्कामोर्तब
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १७ हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाची उभारणी, निर्मुलन केलेली ‘ओडीस्पॉट’, गुडमॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना या विविध आघाड्यांवरील कार्याने शहराने ‘हागणदारीमुक्त’चा प्रवास यशस्वी केला आहे. राज्यस्तरीय समितीच्या सर्वंकष तपासणीत शहर पात्र ठरल्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शुक्रवारी महापालिकेला कळविले आहे.. हागणदारीमुक्त शहरावर क्युसीआयच्या तपासणीनंतर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.
२ ते ४ मे दरम्यान सुधीर शंभरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी केली. पाहणीनंतर या राज्यस्तरीय पथकाने महापालिकेने केलेल्या हागणदारीमुक्तीचा दावा खोडून काढला व अंतिमत: पाच त्रुट्या काढल्या. त्या त्रुट्या उपसचिव सुधाकर बोबडे यांनी आयुक्तांना कळविल्या. त्यानुसार आयुक्त आणि त्यांच्या अधिनिस्थ यंत्रणेने त्या त्रुट्यांचा अभ्यास करून कामाला सुरूवात केली. उघड्यावर शौचाचे जागा आढळून आल्याचे निरिक्षण शंभरकर यांनी नोंदविले होते. अहवालानंतर त्या १४ ओडीस्पॉटचे निर्मूलन करण्यात आले.राज्य समितीच्या भेटीनंतर ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा ५१८ कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गंत आतापर्यंत १२२५४ वैयक्तिक शौचालये तर अन्य योजनांमधून ५८३२ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली.
बऱ्याच प्रमाणात व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळून आल्याचे निरिक्षण तपासणीत नोंदविण्यात आले होते. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता जागा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना १३४ ठिकाणी सामुदायिक शौचालये बांधून देण्यात आली.उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांकडून १६,२०० दंड तसेच फौजदारी कारवाई करण्यात आली.

बोंर्डेंनी केली फेरतपासणी
शंभरकर यांच्या नेतृत्वातील राज्यस्तरिय समितीने पाच त्रुट्या काढल्यानंतर त्या त्रुट्या दूर सारून नव्याने उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करून फेरतपासणीसाठी पुन्हा राज्यस्तरीय समिती पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वातील राज्यस्तरीय तपासणी समितीने १० व ११ जूनला शहराची तपासणी केली.

त्रुट्या दूर करण्यास प्राधान्य
सुधीर शंभरकर यांच्या नेतृत्वातील तपासणी पथकाने काढलेल्या त्रुट्या प्राधान्याने दूर करण्यासाठी आयुक्तांनी पाठपुरावा केला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या नेतृत्वात आरोग्य व स्वच्छता यंत्रणेने शौचालय उभारणीसह ओडीस्पॉटवरील जनजागृतीवर अधिक भर दिला. त्यामुळेच शहर हागणदारीमुक्त होवू शकले, अशी हर्षभरित प्रतिक्रिया आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.

राज्यस्तरीय तपासणी समितीच्या अहवालानुसार अमरावती ‘हागणदारीमुक्त शहर’ म्हणून तपासणीत पात्र ठरले आहे. क्युसीआयच्या तपासणीनंतर शहर ओडीएफवर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
- हेमंत पवार
आयुक्त, मनपा

Web Title: ODF dream of city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.