कॅफे शिलांगण रोडचा; प्रकार तोच अश्लिलतेचा! पाच जोडपी ताब्यात, कॅफेमालकाविरुद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: October 3, 2022 05:11 PM2022-10-03T17:11:30+5:302022-10-03T17:12:24+5:30
Crime News: राधानगर, सहकारनगर, कठोरा रोड, गाणुवाडी येथील कारवाईची शाई वाळते न वाळतेच राजापेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी शिलांगण रोडवरील ग्राऊंड व्ह्यू कॅफेमध्ये धाड घालून पाच प्रेमीयुगुलांना अश्लिल चाळे करताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले
- प्रदीप भाकरे
अमरावती - राधानगर, सहकारनगर, कठोरा रोड, गाणुवाडी येथील कारवाईची शाई वाळते न वाळतेच राजापेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी शिलांगण रोडवरील ग्राऊंड व्ह्यू कॅफेमध्ये धाड घालून पाच प्रेमीयुगुलांना अश्लिल चाळे करताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पाच जोडपे व कॅफेमालक अशा एकुण १२ जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
नवरात्रीदरम्यान, शिलांगण रोडवरील त्या कॅफेमध्ये काही प्रेमीयुगुुलांना विशिष्ट रक्कम घेऊन एक दोन तास बसण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरिक्षक प्रशाली काळे यांना सोबत घेऊन ग्राऊंड व्ह्यू कॅफे गाठला. आत झाडाझडती घेतली असता, पाच तरूणी व पाच तरूणी आत अश्लिल चाळे करताना आढळून आले. सोबतच ग्राऊंड व्ह्यू कॅफेचे लायसन्स रद्द करण्यासाठी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे ठाणेदार ठाकरे यांनी सांगितले.