संत्रा उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्या
By admin | Published: October 31, 2015 01:07 AM2015-10-31T01:07:23+5:302015-10-31T01:07:23+5:30
डबघाईस आलेल्या संत्रा उत्पादकांना शासनाने सरसकट २५ हजार रूपये मदत जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली ....
निवेदन : शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
परतवाडा : डबघाईस आलेल्या संत्रा उत्पादकांना शासनाने सरसकट २५ हजार रूपये मदत जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली असून त्यांनी आज गुरूवारी दुपारी ३ वाजता अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के यांना एक निवेदन दिले.
यावर्षी संत्रा उत्पादकांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मालाला उठावच नसल्यामुळे संत्रा तोडणीची प्रक्रिया मंदावली आहे. संत्र्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट व आवाकी काळाचे नियोजन आखले जाते. मात्र यावर्षी भरपूर माल असल्याने बाजारपेठामध्ये मातीमोल भावात विक्री होत आहे. ७ ते ८ रुपये किलो चांगला संत्र्याला भाव मिळत आहे. २० रूपये भाव अपेक्षित होता. किलोमागे १२ ते १५ रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोसळले आहे. इतकेच नव्हे तर वातावरणाचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसला आहे. उष्ण वातावरणामुळे ५० ते ६० टक्के संत्राफळे गळली आहे. भाव कमी व गळतीमुळे एकट्या अचलपूर तालुक्यात ३०० कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र गोरले यांच्या नेतृत्वात संत्रा उत्पादक कृती समितीचे सुभाष उभाड, कृऊबास संचालक दीपक पाटील टवलारकर, पं. स. उपसभापती गजानन भोरे, कृउबास उपसभापती कुलदीप काळपांडे, राहुल कडू, मधुकर नाकट, कैलास आवारे, साहेबराव काठोळे, अवधुतराव हरणे, नितीन आगे, रणजित लहाने, तुळशीदास राहाटे, प्रशांत देशमुख, कृउबास संचालक बाबूराव पाटील गावंडे, रवी पाटील सालेपूरकर, संजय चोबीतकर, भाष्कर मेहरे, खविस उपाध्यक्ष विजय बेलसरे, खविस संचालक अशोक ठाकरे, विष्णुकांत भुसारी, संजय चरोडे, कृउबास संचालक पोपट घोडेराव, अजय पाटील उभाड, अविनाश देशमुख, दिनेश ठाकरे, नरेंद्र पाटील पवित्रकार, गोविंद गाडगे, सुभाष लहाने, पुरुषोत्तम लकडे, विश्वनाथ रामेकर, नीलेश वऱ्हेकर, पुष्पेंद्र राहाटे, विकास पिसाळ, पं. स. सदस्य ओमश्री घोरे, रवींद्र मुळे, शिवाजी कडू, दीपक लक्ष्मीनारायण अग्रवाल, अॅड. अभिजित तनपूरे, अॅड. जितेंद्र गौड, अॅड. यावले, हरिश्चंद्र खुजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)