अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळले

By admin | Published: June 29, 2017 12:30 AM2017-06-29T00:30:00+5:302017-06-29T00:30:00+5:30

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली. या योजनेचे निकष बुधवारी जाहीर केले.

Officers and employees are excluded from the loan amount | अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळले

अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळले

Next

निकष जाहीर : कर्जमाफीत अटी, शर्र्थींची जम्बो यादी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली. या योजनेचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये शासकीय, निमशासकीय व अनुदानित संस्थाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. मात्र सरसकट कर्जमाफी न करता यामध्ये अटी व शर्थी अधिक असल्याने ‘मदत कमी, सोंगच फार’ असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
शासनाने १ एप्रिल २०१२ रोजी व त्यानंतरच्या कालावधीत पीक कर्ज व मध्यम मुदती कर्ज घेतलेल्या व अश्या कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यत थकबाकीदार शेतकऱ्यांचे मुद्दल व व्याजासह दीड लाखांपर्यतच्या मर्यादेत कर्जमाफी करण्याचा शासन निर्णय बुधवारी जारी केला. जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार थकीत शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी निकषात पात्र ठरतात हे आगामी काळात निश्चित होतील. मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘एक वेळ समझोता योजना’ म्हणून शेतकऱ्यांनी त्यांच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासन दीड लाखाची रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे.
सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जूनपर्यत थकबाकीदार असतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जे थकीत नाही त्यांना २५ हजाराची रक्कम शासन अदा करणार आहे.

जि.प. सदस्यही कर्जमाफीतून वगळले
राज्यातील आजी, माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह जिल्हा परिषद व महापालिका सदस्य, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, सहकारी संस्थाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व सेवाकर भरणाऱ्या व्यक्तींना याधून वगळण्यात आले आहे.
जिल्ह्यात १.६७ लाख शेतकऱ्यांना लाभ
जिल्ह्यात ३० जून २०१६ या कालावधीत एकुण ३ लाख ३३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. यापैकी २.१२ ला शेतकऱ्यांकडे दीड लाखांपर्यत कर्ज थकीत आहे. शेती पूरक कर्ज वगळता १.६७ लाखांपैकी निकषपात्र शेतकरी किती हे छानणीनंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Officers and employees are excluded from the loan amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.