अधिकाऱ्यांचे कामबंद, महसुली कामकाज प्रभावित

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 3, 2023 04:45 PM2023-04-03T16:45:05+5:302023-04-03T16:49:10+5:30

कलेक्ट्रेटमध्ये नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे धरणे

Officials strike, revenue operations affected, strike of Naib Tehsildar, Tehsildar, Upazila Adhikari in the Collectorate | अधिकाऱ्यांचे कामबंद, महसुली कामकाज प्रभावित

अधिकाऱ्यांचे कामबंद, महसुली कामकाज प्रभावित

googlenewsNext

अमरावती : नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ याचे ग्रेड पे देण्याचे मागणीसाठी जिल्ह्यातील ९४ नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याच मागणीसाठी सर्वांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन तास धरणे दिले. अधिकारीच नसल्याने अनेक महत्वाची कामे ठप्प पडली आहेत.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा नायब तहसीलदार यांना राजपत्रित वर्ग -२ चे ग्रेड पे ४,८०० रुपये लागू करण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नीता लबडे, कार्याध्यक्ष वैभव फरतारे, सचिन अशोक काळीवकर, उपाध्यक्ष अरविंद माळवे, उपजिल्हाधिकारी, राम लंके, आशिष बिजवल, विवेकानंद काळकर, मनीष गायकवाड, नितीन व्यवहारे, अभिजित जगताप, वैशाली पाथरे, प्रशांत अडसुळे, नरेंद्र कुरळकर, प्रवीण देशमुख, आशिष नागरे, श्यामसुंदर देशमुख, राजीव वानखडे, एस. व्ही. ठाकरे, नीलिमा मते, राजेश चौधरी, टीना चव्हान, यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, तहसीलदार, एसडीओ व उपजिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका

जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसला, याशिवाय महसुली कामकाजही प्रभावित झाले आहे. आंदोलनात ६१ नायब तहसीलदार, १९ तहसीलदार व १४ उपजिल्हाधिकारी असे एकूण ९४ अधिकारी सहभागी असल्याने महसुलची प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया प्रकरणे, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, पुरवठा, यासह अपील प्रकरणे ठप्प राहिली आहेत.

Web Title: Officials strike, revenue operations affected, strike of Naib Tehsildar, Tehsildar, Upazila Adhikari in the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.