'ऐ खुदा... कोरोना बिमारी से हर इन्सान की हिफाजत फरमा'...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:38+5:302021-05-15T04:12:38+5:30
: तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त फोटो पी १४ चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे : महिनाभरापासून मुस्लिम बांधवांचा अत्यंत ...
: तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त
फोटो पी १४ चांदूर रेल्वे
चांदूर रेल्वे : महिनाभरापासून मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू होते. दरम्यान मुस्लिम बांधवांनी नमाज, सहरी, इफ्तार आदी धार्मिक विधी घरच्या घरी केली. गुरुवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा ईद – उल – फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र साजरा केला गेला.
कोरोना विषाणूचा सर्वत्र झालेला शिरकाव व संभाव्य धोका लक्षात घेता, तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी घरच्या घरीच ईद साजरी केली. राष्ट्रीय एकात्मता, विश्वशांतीबरोबरच कोरोनामुक्तीसाठी घरीच दुआ करण्यात आली. ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात तालुक्यात पोलीस बंदोबस्त होता. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदाची रमजान ईद भीतीच्या सावटाखालीच साजरी झाली. चांदूर रेल्वे शहरातील सर्वच मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरातच नमाज पठण करून विश्वाच्या शांतीसाठी व उत्तम स्वास्थासाठी अल्लाहकडे साकडे घातले. कोरोनाबाधितांची प्रकृती लवकरात लवकर सुधारून त्यांचे जीवन आरोग्यदायी होवो आणि एकूणच जगभरातून कोरोना समूळ नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना प्रत्येकाने केली. ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात ईदगाह परिसर तसेच तालुक्यातील प्रत्येक मशिदीसमोर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.