भेंडी, चवळीला दर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:37+5:302021-05-15T04:11:37+5:30
फोटो पी १४ कावली कावली वसाड : वसाड येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील भेंडी व चवळी जनावरांना चरण्यासाठी मोकळी केली. ...
फोटो पी १४ कावली
कावली वसाड : वसाड येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील भेंडी व चवळी जनावरांना चरण्यासाठी मोकळी केली. भाज्यांना दर मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. लाॅकडाऊनचा फटकादेखील त्यांना बसला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील शेतकरी गजानन खराबे यांनी शेतात भाजीपाला पीक म्हणून चवळी व भेंडीची लागवड केली. पीकही जोमदार आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे भाजीपाला असो किंवा कोणतेही शेतातील वाण, त्याला योग्य भाव मिळत नसल्याने सध्या ते जनावरांचे कुरण बनले असल्याचे यावेळी खराबे यांनी सांगितले. लावलेला खर्चही निघत नसल्याने आधीच डबघाईस असलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शेतातील भेंडी व चवळी तोडण्यासाठी ही मजूर मिळत नसल्याने व मजूर मिळाले तरी योग्य भाव मिळत नसल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी तोटा व कोरोना संसर्गाच्या दुहेरी संकट ओढवले. आठ ते दहा दिवसांपासून या भागातील वीजपुरवठासुद्धा बंद असल्याचे वसाड येथील शेतकऱ्यांनी सांगितले.