वृद्ध दाम्पत्याला नऊ हजारांची रक्कम केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:27+5:302021-07-16T04:11:27+5:30
(फोटो कॅप्शन ,अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये हरवलेला बटवा घेताना राजकन्या शिंगणे ठाणेदार सेवानंद वानखडे मोबाईल शॉपी चे संचालक ...
(फोटो कॅप्शन ,अचलपूर पोलीस स्टेशन मध्ये हरवलेला बटवा घेताना राजकन्या शिंगणे ठाणेदार सेवानंद वानखडे मोबाईल शॉपी चे संचालक गजानन लखपती)
परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे
अचलपूर शहरात निवळी परिसरातील एका मोबाईल शॉपी मध्ये वृद्ध दाम्पत्य आले काही साहित्य त्यांनी येथून खरेदी केले आणि आठ हजार नऊशे चाळीस रुपये असलेला बटवा खाली पडला दुकान चालकाला दिसले त्याने सीसीटीव्ही मध्ये बघून शोध घेत ही रक्कम पोलिसांमार्फत परत केली दुकान चालकाचा प्रामाणिकपणा शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे
अचलपूर शहरातील देवडी परिसरात मंगलमुर्ती मोबाईल शॉपी असून सदर मोबाईल शॉपीमध्ये १२ जुलै रोजी मोबाईल शॉपी चे मालक गजानन दिनकरराव लखपती यांना एक बटवा सापडला. त्या बटव्यामध्ये ८९४० - रोख रक्कम होती. त्यानी आजुबाजूच्या लोकांना विचारणा केली. बटवा येथील नसल्याचे त्यांना माहित पडले. त्यांनी दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा चेक केला. बटवा कॅमेऱ्यात दिसला तेव्हा दुकानात वृध्द दाम्पत्य मोबाईल रिचार्ज साठी व चार्जर विकत घेण्यासाठी आलेले होते. त्यानुसार गजानन लखपती यांनी सदर वृध्द दाम्पत्यांचा शोध घेणे सुरू केले. वृध्द दाम्पत्य नजीकच्या भिलोना गावातील असल्या खात्री पटली. वृध्द दाम्पत्याची माहिती अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, यांना दिली रोख रक्कम पोलीस स्टेशनला आणून जमा केली.
बॉक्स
आणि आजीला गहिवरून आले
एखादी वस्तू हरवली तर ती सापडत नाही मग पैशाचा बटवा कोठून सापडणार त्या गरीब दांपत्याला या अचानक झालेल्या आर्थिक नुकसानमुळे चिंतेत टाकले होते ती रक्कम दिनांक १५ जुलै रोजी वृध्द महिला. राजकन्या दिगांबर शिंगणे रा. भिलोना यांना ठाणेदार सेवानंद वानखडे, ठाणेदार, यांचे हस्ते देण्यात आली . राजकन्या शिंगणे यांना गहिवरून आले दुकान मालक व पोलीसांचे आभार त्यांनी मानले मोबाईल शॉपीचे संचालक गजानन लखपती, शुभम हिंगणकर, पो.कॉ. संदीप फुंदे व महिला अंमलदार वैशालीउपस्थितीत होते. अशीच भावना नागरिकांनी ठेवण्याचे आवाहन कोणी समोर यावेळी केले
150721\img-20210715-wa0137.jpg
हरवलेल्या पैशाचा बटवा परत राजकन्या