शेतीच्या पैशाच्या वादातून वृद्धाला लोटलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:40+5:302021-01-01T04:08:40+5:30

पुसला/राजुराबाजार : आपल्या मुलाला विचारल्याशिवाय शेतीचे पैसे काढायचे नाही, असे म्हणत भीमराव रोडबाजी गोरसे (८०, रा. बेसखेडा) यांना लोटलाट ...

The old man was overwhelmed by a dispute over farm money | शेतीच्या पैशाच्या वादातून वृद्धाला लोटलाट

शेतीच्या पैशाच्या वादातून वृद्धाला लोटलाट

Next

पुसला/राजुराबाजार : आपल्या मुलाला विचारल्याशिवाय शेतीचे पैसे काढायचे नाही, असे म्हणत भीमराव रोडबाजी गोरसे (८०, रा. बेसखेडा) यांना लोटलाट करून खाली पाडले. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. २८ डिसेंबर रोजी बेसखेडा स्टॅन्डवर ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी उमेश भीमराव गोरसे (५१, रा. बेसखेडा) विरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

जरूड शिवारातून मोबाईल लंपास

जरूड : संत्रा बागेत ओलित करण्यास गेलेल्या सुरेश बिजवे (६५, जरूड) यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल २० नोव्हेंबर रोजी चोरीला गेला. जरूड शिवारात ही घटना घडली. वरूड पोलिसांनी बिजवे यांच्या तक्रारीवरून २८ डिसेंबर रोजी अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला.

--------------

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

मोर्शी : कारच्या धडकेत माणिक अमृत धर्माळे (६५, रा.दीप कॉलनी, मोर्शी) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. २१ डिसेंबर रोजी धर्माळे हे दुचाकीने एका मंगल कार्यालयाकडे जात असताना एमएच २७ एसी ९१८३ या कारने त्यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागला. मोर्शी पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी कारचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावर अपघात

नेरपिंगळाई : अंबाडा गावाहून मोर्शीकडे येणाऱ्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने मागून धडक दिली. यात चंद्रशेखर मधुकर कायकट (३२, बाजारपुरा, अंबाडा) व गोपाल नामक दुचाकीस्वार जखमी झाले. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एका मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावरील भुसारी यांच्या वीटभट्टीजवळ हा अपघात घडला. मोर्शी पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

जामगाव येथून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त

बेनोडा : वरूड तालुक्यातील जामगाव येथे रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास रेती जप्त करण्यात आली. चालक प्रवीण रामदास तायवाडे (३०, रा. जामगाव) याला अटक करण्यात आली, तर त्याचा भाऊ प्रमोद तायवाडे पसार झाला. २८ डिसेंबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी दोघा भावांविरूद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

खोडगाव येथून रोख लांबविली

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील खोडगाव येथील एका महिलेकडील थैलीतून १९ हजार ९०० रुपये काढून घेण्यात आले. अक्षय प्रभाकर राऊत यांच्या आईने २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास बँकेतून २० हजार रुपये काढले. ती रक्कम त्यांनी स्वत:कडील थैलीत ठेवली. अज्ञाताने थैलीतील पासबुकमध्ये ठेवलेले १९, ९०० रुपये काढून नेले. अंजनगाव पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------------

सोनगावातून दुचाकी लंपास

चांदूररेल्वे : तालुक्यातील सोनगाव शिवार मार्गावरून एमएच २७ व्ही १०१३ या क्रमांकाची दुचाकी २७ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास चोरीला गेली. याप्रकरणी दुचाकी मालक अमोल नागणे (२५, रा. सोनगाव) याच्या तक्रारीवरून चांदूररेल्वे पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

नांदगाव खंडेश्वरमधून लोखंड लंपास

नांदगाव खंडेश्वर : येथील महेश चौकडे यांच्या बांधकामावरून ८ हजार रुपये किमतीचे लोखंड चोरीला गेले. २६ ते २७ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

हॉटेलमध्ये मारहाण, अनोळखीविरूद्ध गुन्हा

परतवाडा : येथील जयस्तंभ चौकातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या मो. आरिफ अ. कलिम (३८, तळेगाव मोहना) यांना एकाने हातोडीने मारहाण केली. २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------

शहानूर नदीपात्रात रेतीची चोरी

अंजनगाव सुर्जी : शहरातील शहानूरचे नदीपात्र रेतीचोरांसाठी सोन्याची खाण ठरली आहे. या नदीपात्रात रेती चोरांनी ठिकठिकाणी खड्डे करून ठेवले आहेत. शहानूर नदीपात्रात सद्यस्थितीत रेती शिल्लक उरलेली नाही. त्यामुळे आता नदीपत्रात खड्डे करून रेती उपसण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

--------------

वराहांचा हरभरा पिकात धुडगूस

दर्यापूर : सोयाबीनपाठोपाठ कपाशीनेही हात दाखविल्याने शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणात रबीतील हरभरा पिकाकडे वळला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात चन्याची पेरणीदेखील झाली. मात्र, तूर्तास हरभऱ्याच्या शिवारात रानडुकरांसह गावातील मोकाट वराहारांनी धुडगूस घातला आहे. वन्यप्राण्यांचा धुडगुस थांबवावा, त्यासाठी वनविभागाने उपाजयोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

----------

हयातीच्या दाखल्यासाठी वृध्दांची परवड

धामणगाव रेल्वे : पेन्शनधारकांनी फेब्रुवारी २०२१ पर्यंत हयातीचा दाखला मागू नये, असा शासनादेश आहे. असे असताना गावागावांत असलेल्या श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला मागितला जात असल्याने त्यांची परवड होते आहे. गावात सेतू केंद्रच नसल्याने दाखला आणायचा कोठून, असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

-------------

संत्रा केवळ १० ते १२ रुपये किलो

मोर्शी : तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्र्याला भाव नसल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून २०० रुपये कॅरेटने शेतकऱ्यांचा संत्रा विक्री होतांना दिसत आहे .

---------------

चांदूरबाजार तालुक्यात रेतीचे उत्खनन

चांदूरबाजार : तालुक्यातील काही मोजक्या नदीपात्रातून रेती तस्करी होऊ नये, यासाठी महसूल यंत्रणेकडून उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यामुळे तस्करांनी त्या जागा सोडून नदीच्या दुसऱ्या तिरावरून रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. मासोद, फुबगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव या भागातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत होत आहे.

-------------

Web Title: The old man was overwhelmed by a dispute over farm money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.