जुन्या पेन्शन योजनेसाठी आज अन्नत्याग
By admin | Published: April 15, 2017 12:07 AM2017-04-15T00:07:03+5:302017-04-15T00:07:03+5:30
जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करावी, या मागणीसाठी १५ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक महासंघ...
अमरावती : जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करावी, या मागणीसाठी १५ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष गौरव काळे, जिल्हा सचिव प्रज्ज्वल घोम, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे देवीदास बसवदे, रामदास कडू आदींनी केले आहे.
तामिळनाडू राज्य सरकारने ज्याप्रमाणे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली, त्याच धर्तीवर राज्यातही ती लागू व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)