तिरडी बांधली अन्.. ८० वर्षीय वृद्ध महिला जिवंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:22 AM2018-10-01T01:22:26+5:302018-10-01T01:22:43+5:30
पटेल नगरातील उच्चभु्र वस्तीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धाचे निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून तिरडी बांधण्यात आली, अन..वृद्ध महिलेची हालचाल झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या तपासणीत ती वृद्धा ब्रेनडेड असल्याचे समजले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पटेल नगरातील उच्चभु्र वस्तीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धाचे निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करून तिरडी बांधण्यात आली, अन..वृद्ध महिलेची हालचाल झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या तपासणीत ती वृद्धा ब्रेनडेड असल्याचे समजले. मात्र, कुटुंबीय घरात दडून बसलेल्याचे पाहून नागरिक सभ्रंमात पडले होते.
पटेलनगरातील तिरुपती अपार्टमेंट येथील रहिवासी बजरंग खंडेलवाल यांच्या कुटुंबीयात आई, एक भाऊ व एक बहीण राहतात. दोन दिवसांपासून खंडेलवाल यांची ८० वर्षीय आई वृद्धाकाळाने निद्रीस्त अवस्थेत होत्या. काय झाले काय नाही, हे कळण्यासाठी डॉक्टरांना बोलाविण्यात आले. वृद्धाचे निधन झाल्याचे कळताच नातेवाईकांसह शेजारी व मित्र मंडळींनी अत्यंसंस्काराची तयारी केली. तिरडी बांधण्याचे काम सुरू होते, तर एकीकडे वृद्धाला आंघोळ घालण्याची तयारी सुरू होती. दरम्यान वृद्धाची हालचाली झाल्याचे लक्षात आले. अंत्यसंस्कार केला नाही, त्यामुळे शेजाºयासह परिसरातील नागरिक संभ्रमात पडले. ते विचारपुस करायला जायचे, मात्र, घरात येऊ दिल्या जात नव्हते. त्यामुळे नागरिकांचा वेगळाच संशय आला. खंडेलवाल यांच्या आईचे निधन झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. शेजाºयापाजाºयासह परिसरातील नागरिक खंडेलवाल यांच्या घरात जाऊन डोकावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना घरात शिरण्यास मज्जाव केला जात होता. दरम्यान कुटुंबियांनी काही परिचितांना फोन करून सल्ला घेतला. वृध्देला मुंबईला हलविण्याची तयारी दाखविली. नागरिकांमधील उलटसुलट चर्चा पाहून अखेर बजरंग खंडेलवाल यांनी वृध्द आईला डॉ. अतुल यादगिरेकडे दाखविण्याची तयारी केली. चारचाकी वाहनात वृद्ध आईला घेऊन ते थेट मुंबईकडे रवाना झाले. यासंदर्भात नगरसेविका मंजूषा प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क केला असता, खंडेलवाल यांच्या आईची प्रकृती अत्यवस्थ असल्याने नुकतेच तिरुपती अपार्टमेटच्या तळमजल्यावर राहायला आले. ते आईची सेवा करीत होते. डॉक्टरने चुकीचे निदान दिल्यामुळे आम्ही अत्यंसंस्काराची तयारी केल्याचे खंडेलवाल म्हणत असल्याचे जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.