‘ओमायक्रॉन’, तपासणीसाठी १३ नमुने दिल्लीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:01:05+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला बी.जे. मेडिकल व एनआयव्हीला (राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा) पाठविण्यात येत आहे. या कालावधीत दर १५ दिवसांनी १५ याप्रमाणे साधारणपणे १४० नमुने यासाठी पाठविण्यात आलेले आहे. याचा अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळेच जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सध्या २९ देशांमध्ये नोंद झालेल्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटविषयी शासन स्तरावर गंभीरतेने घेतल्या जात आहे. यामध्ये ३० पेक्षा कमी सीटी व्हॅल्यू नसणारे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत अमरावतीतून १३ नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संक्रमितांचे नमुने पुण्याला बी.जे. मेडिकल व एनआयव्हीला (राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळा) पाठविण्यात येत आहे. या कालावधीत दर १५ दिवसांनी १५ याप्रमाणे साधारणपणे १४० नमुने यासाठी पाठविण्यात आलेले आहे. याचा अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळेच जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचे संकट ओढावले होते. या व्हेरिएंटचा संक्रमण दर डेल्टापेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत चार महिन्यात ७० हजारांवर बाधित व १२०० वर नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.
आता २९ देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची नोंद झालेली असतानाच भारतातदेखील दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेद्वारा अलर्ट जार करण्यात आलेला आहे.
विदेशातून आले सात प्रवासी अमरावतीत
ईस्ट आफ्रिका, दुबई आदी देशांमधून सात प्रवासी सध्या अमरावतीला आले आहेत. यापैकी तीन प्रवाशांसोबत संवाद झाला व त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेली आहे. अहवाल निगेटिव्ह आहे. सध्या ते विलगीकरणात आहेत.
९० टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा किंवा डेल्टा प्लस
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविलेल्या नमुन्यांमध्ये ९० टक्के नमुने डेल्टा किंवा डेल्टा प्लस या विषाणूचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची नोंद झाल्यानंतर पॉझिटिव्ह असणारे सर्व सॅम्पल आता दिल्ली प्रयोगशाळेला पाठविण्यात येत असल्याचे प्रयोगशाळेने सांगितले.
तर ओमायक्रॉन सस्पेक्टेड जिन्स
रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर ‘एस’ जिन ड्रापआऊट करतात. यामध्ये दोन प्रकारचे जिन्स असतात. एक स्क्रिमिंग जिन्स, ज्याला ‘एन’ किंवा ‘ओ’ म्हणतात. दुसरे कन्फरेटरी जिन्स असतात. यामध्ये ओआरएस बी, आरडीआयसी किंवा ‘एस’ जिन असतात. यापैकी ‘एस’ जिन येथे ॲम्पिफ्लाय होत नाही. यासाठी पॉझिटिव्ह ‘एस’ जिन्स स्क्रिमिंग करावा लागतो. मात्र, ‘एस’ जिन मिळाल्यास ‘सस्पेक्टेड ओमायक्राॅन’ म्हणून नमुना पाठवावा लागतो.