हनुमान जयंतीला आला ‘आनंदाचा शिधा’, वितरण सुरू
By जितेंद्र दखने | Published: April 4, 2023 05:14 PM2023-04-04T17:14:44+5:302023-04-04T17:15:08+5:30
५ लाख ५५ हजार ६४३ लाभार्थी
अमरावती : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या काळात शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, गुढीपाडव्याला हा शिधा लाभार्थ्यापर्यत पोहोचू शकला नाही. आता हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १९१४ रेशन दुकानातून वितरण सुरू झाले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जात होता. करोना सुरू केले होते. आता मोफत धान्य बंद करून स्वस्त धान्यच मोफत दिले जात आहे. याबरोबर दिवाळीला आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. यात १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो 'चनाडाळ आणि १ किलो पामतेल अशा चार वस्तूंसाठी असलेला संच १०० रुपयांत देण्यात आला. या योजनेचा विस्तार करून गुढीपाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या काळात अंत्योदय आणि प्राधान्य गटासाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करण्यात आली.
हा शिधा वेळेत मिळावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यानी व्यक्त केली असता गुढीपाडव्याला अन्न धान्य वितरण अधिकान्यांकडे साहित्यच पोहोचले नव्हते. रवा आणि चनाडाळ तेल,साखर आदी साहीत्या कमी प्रमाणात प्राप्त झाले होते. अशातच ६० टक्यापेक्षा जास्त साठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता सर्व साहित्य प्राप्त झाले असून वितरण सुरू झाले असल्याने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ६४३ शिधापत्रिका धारकांना शिधा मिळणार आहे. उर्वरित साहित्य लवकर मिळावे, यासाठी केंद्रीय भंडार विभागाकडे संपर्क साधण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'असे आहेत लाभार्थी
अंत्योदय रेशनकार्ड : १ लाख २५ हजार ६३२
प्राधान्य गट रेशनकार्ड : ३ लाख ४३ हजार २८२
एकूण रेशन दुकाने -१९१४
आनंदाचा शिधा संचाचे ६० टक्के साहीत्य उपलब्ध झाले आहे.या शिधा जिन्नसचे वितरण रेशन दुकानामार्फत सुरू केलेले आहे. उर्वरित संच पुरवठा करण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केलेला आहे.त्यामुळे लवकरच मागणीनुसान संच उपलब्ध होतील.आणि महिन्या अखेर वितरण पूर्ण होईल.
- डी.के.वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी