मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:36+5:302021-07-31T04:13:36+5:30
बहुतांश बस बंद ; तातडीने बस सुरू करण्याची मागणी अमरावती : राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सर्व व्यवहार सुरू ...
बहुतांश बस बंद ; तातडीने बस सुरू करण्याची मागणी
अमरावती : राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. एसटी बसही सुरू झाल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी बस अद्यापही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्यात आठ आगार आहेत. यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या बस स्थानकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३७१ पैकी २५० बस सुरू आहेत. विविध मार्गांवर या बस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु, अद्यापही ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या ३५ बस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक कामासाठी शहराच्या ठिकाणी येत असतात. त्यांच्या येण्या-जाण्याची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाकडून मुक्कामी बस पाठविली जाते. परंतु, सध्या बहुतांश मुक्कामी बस आगारात उभ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बॉक्स
५० टक्के बस आगारातच
१) जिल्ह्यात २५० बस सुरू आहेत. यात परतवाडा, वरूड, दर्यापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला व इतर ठिकाणी या बस धावतात.
२) शहरी भागात बस धावत असल्या तरी ग्रामीण भागात जाणारे अनेक बस बंद आहेत.
३) ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. महामंडळाने तातडीने बस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
प्रवासी संख्येत घट
कोट
सध्या कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण भागात प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सध्या लांब पल्ल्याच्या बस सुरू आहेत. काही ठिकाणी मुक्कामी परत जात आहेत. नागरिकांनी मागणी केल्यानुसार बस सुरू केल्या जातील. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी प्रवाशांची कमी आहे.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक
बॉक्स
रुग्ण घटले, एसटी संख्या कधी वाढणार?
कोट
सध्या कोराेना रुग्णसंख्या कमी झाली असून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील मुक्कामी बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून याकडे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने बस सुरू कराव्यात.
- प्रशांत काडगाळे, प्रवासी
कोट
आमच्या गावाला सुरुवातीला मुक्कामी बस येत होती. परंतु आता मुक्कामी बस येत नाही. सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या घटले असून महामंडळाने तातडीने मुक्कामी बस सुरू करावी. अनेक जण सकाळी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जातात. मात्र बस नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- साहेबराव रोकडे, प्रवासी
बॉक्स
आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बस
अमरावती २-०
बडनेरा-७-०
दर्यापूर-१३-०६
परतवाडा ११-५
चांदूर बाजार-१८-०६
मोशी ०९-०७
वरूड १०-०६