दीड लाखांचे अवैध सागवान जप्त

By admin | Published: January 24, 2016 12:20 AM2016-01-24T00:20:35+5:302016-01-24T00:20:35+5:30

अमरावतीचे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी बारखडे व त्यांचे सहकारी व पोलीस ...

One and a half million illegal sewen seized | दीड लाखांचे अवैध सागवान जप्त

दीड लाखांचे अवैध सागवान जप्त

Next

परतवाडा वनपरिक्षेत्र : वनविभागाची कारवाई
परतवाडा : अमरावतीचे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी बारखडे व त्यांचे सहकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी पहाटे दरम्यान रवी रंगलाल पंधरे (रा. मुंगलाई, परतवाडा) यांचे परतवाडा बेलखेडा रस्त्यावरील मौजा वडुरा येथील शेतात अवैध सागवानसंदर्भात धाड टाकली.
शेतातील झोपडीमध्ये सुतार कामाची अवजारे व झोपडीच्या स्वभोवताली अवैध सागवान नग १२६ घ.मी. १.२७४ जप्त करण्यात आली. त्यांची किंमत बाजार भावानुसार दीड लाख रुपये ओढळले. आरोपी फरार असून त्याच्याविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) फ ४१, ४२ तसेच मुंबई वननियम १९४२ ची कलम ६६, ८२, ८८ चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरुध्द वनगुन्हा क्रमांक १२/२० २३.०१.२०१६ जारी करण्यात आला आहे.
आरोपीचा कसून शोध सुरू आहे. त्यास लवकरच अटक करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांनी सांगितले. या कारवाईत वनरक्षक सुरेश काळे, के.बी. काळे, एस.एस. निकम, एन.व्ही. ठाकरे, प्रवीणा निमकर, परतवाडा पोलीस स्टेशनचे प्रकाश इंगळे, वनमजुर राजेश काळे, सुनील कथलकर, श्रीधर गायकवाड, दिलीप देशकर, वर्धे, श्याम सावळे आदी वनकर्मचारी सहभागी होते.

Web Title: One and a half million illegal sewen seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.