गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:06 PM2019-01-15T22:06:15+5:302019-01-15T22:06:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गुजरातच्या अहमदाबादवरून अमरावतीत दाखल झालेला ट्रकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पकडून तब्बल १ हजार ५०० किलोचा ...

One and a half quintals of plastic seized in Amravati | गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त

गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त

Next
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस प्रशासनाचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुजरातच्या अहमदाबादवरून अमरावतीत दाखल झालेला ट्रकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पकडून तब्बल १ हजार ५०० किलोचा प्लास्टिकचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी दुपारी महापालिकेच्या पथकाने शहरातील एका गॅरेजमध्ये ही कारवाई केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
अमरावती महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग यांनी गोपनीय माहितीवरून संयुक्तरीत्या शहरातील मोरबाग स्थित गुजरात ट्रान्सपोर्टवर धाड टाकली. त्या ठिकाणी उभे असलेले चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ एक्स ४६२३ मध्ये प्लास्टिक पन्नीचा मोठा साठा आढळून आला. महापालिकेने त्या प्लास्टिक पन्नीचे मोजमाप केले असता, तो माल १ हजार ५०० किलो असल्याचे स्पष्ट झाले. त्याची किंमत लाखो रुपयात असल्याचे निदर्शनास आले. महापालिका अधिकाऱ्यांनी त्या वाहनातील १ हजार ५०० किलोच्या प्लास्टिक पन्नीचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय महापालिकेने परफेक्ट फॅशन व रॉयल ट्रान्सपोर्ट येथे धाड टाकून ८० किलो प्लास्टिक चमचे जप्त केला. महापालिकेने परफेक्ट फॅशन, रॉयल ट्रांन्सपोर्ट व गुजरात महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला. या कारवाईत महापालिका उपायुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र्र वानखडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स्वप्निल लिंगडे, क्षेत्र अधिकारी अरतपायरे, सहायक आयुक्त तौसिफ काझी, मनपाचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आय.आर. खान, प्रल्हाद राऊत, विकी जेदे, राजेश राठोड, ए.एम. सैयद, मनीष नकवाल, मोहीत जाधव, दिलीप बोयत व पोलीस विभागाचे कर्मचाºयांचा सहभाग होता.
खर्रा पन्नी साईबाबा ट्रेडर्सच्या
प्लास्टिकबंदीनंतरही त्याचा वापर करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी महापालिकेने मोरबाग येथील गुजरात ट्रान्सपोर्ट येथील वाहनातून प्लास्टिक पन्नीचा मुद्देमाल जप्त केला. त्या पन्न्या पानटपरीवर मिळणाऱ्या खऱ्यासाठी उपयोगात पडतात. साईबाबा ट्रेडर्सचे श्यामकुमार मोटवाणी यांचा तो मुद्देमाल असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.

गुजरात राज्याच्या अहमदाबादावरून प्लास्टिकचा मुद्देमाल अमरावतीपर्यंत आणला गेला. तो माल पकडून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
- नरेंद्र वानखडे,
उपायुक्त, महापालिका.

Web Title: One and a half quintals of plastic seized in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.