झटापटीनंतर एका चेनस्नॅचर्सचे पलायन, दुसऱ्याने घेतली लिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:01:19+5:30
रात्री १० वाजताच्या सुमारास उमरीकर दाम्पत्य घराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. प्रवेशद्वार उघडून घरात प्रवेश करीत असतानाच दुचाकीने दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ येऊन थांबले. त्यापैकी एका तरुणाने रेणुका यांच्या गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून रेणुका व नितीन यांनी चेनस्नॅचर्सचा प्रतिकार केला. चेनस्नॅचर्स व उमरीकर दाम्पत्यांमध्ये झटापट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबादेवीचे दर्शन घेऊन पतीसोबत घरी परतत असलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता पूजा कॉलनीत घडली. मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असताना पतीने चेनस्नॅचर्सला विरोध केला. मात्र झटापटीनंतर चेनस्नॅचर्सने दुचाकी घेऊन पळ काढला. मात्र काही अंतरावर आणखी एका व्यक्तीने चेनस्नॅचर्सची दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेले चेनस्नॅचर्स एकमेकांपासून वेगळे झाले. एक दुचाकी घेऊन पसार झाला, तर एकाने चक्क लिफ्ट मागून पलायन केले.
दरम्यान राजमंगल कॉलनीत चोरट्यांनी सायंकाळी अंजली कोरडे या आणखी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याचे वृत्त आहे.
पूजा कॉलनीतील रहिवासी रेणुका नितीन उमरीकर (५७) नरहरी मंगल कार्यालयाजवळ राहतात. शनिवारी रेणुका व त्यांचे पती नितीन रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून ९.३० वाजता घरी निघाले. रात्री १० वाजताच्या सुमारास उमरीकर दाम्पत्य घराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. प्रवेशद्वार उघडून घरात प्रवेश करीत असतानाच दुचाकीने दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ येऊन थांबले. त्यापैकी एका तरुणाने रेणुका यांच्या गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून रेणुका व नितीन यांनी चेनस्नॅचर्सचा प्रतिकार केला. चेनस्नॅचर्स व उमरीकर दाम्पत्यांमध्ये झटापट झाली. मात्र चोरांनी रेणुका यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकून पळ काढला. त्यांनी चोर-चोर, अशी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील काही नागरिकांचे लक्ष भरधाव दुचाकी घेऊन जाणाºया चोरांकडे गेले. त्यावेळी सागर वानखेडे यांनी चेनस्नचर्सचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचे प्रयत्न केला. त्यावेळी चेनस्नचर्स काही सेकंदाकरिता थांबले. त्यांना पकडण्याआधीच एक चेनस्नचर्स दुचाकीने पळून गेला, तर दुसरा चेनस्नचर्स पायदळ दुसºया दिशेने पळाला. त्या चेनस्नॅचर्सने काही अंतरावरून एका व्यक्तीस चोर पळाल्याची बतावणी करून लिफ्ट मागितली. त्यानेच त्या व्यक्तीला राजापेठ बसस्थानकापर्यंत नेले. त्यानंतर तेथून त्याने पळ काढला. पोलिसांनी आरोपींचे शोधकार्य सुरू केले आहे.
या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुºयाचे पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम व पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांनी घटनास्थळाची चौकशी केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.