अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:17 PM2023-05-17T13:17:48+5:302023-05-17T13:24:46+5:30

सौरभ वानखडे हे गुगलवर जॉब सर्च करीत होते. ते करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठविण्यात आली.

One click and Saurabh lost 2.60 lakhs; Cheating in the name of movie rating | अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक

अमरावतीत एक क्लिक अन् सौरभने गमावले २.६० लाख; मुव्ही रेटींगच्या नावावर फसवणूक

googlenewsNext

अमरावती येथील एका व्यक्तीला ‘मुव्ही रेटिंग’ व्यवसायात गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन सायबर गुन्हेगारांनी २.६० लाख रुपयांनी ऑनलाईन लुटले. तक्रारदाराला सुरुवातीला उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि नंतर त्यांना पैसे देण्यास भाग पाडले गेले. तक्रारकत्याला टास्क देण्यात आला.

५ मे ते १४ मे दरम्यान फसवणुकीची ही घटना घडली. याप्रकरणी सौरभ लक्ष्मण वानखडे (रा. राठीनगर) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी एका अज्ञाताविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ५ मेच्या पुढील आठवड्यांत, त्यांना आणखी मोठी रक्कम भरायला सांगितली आणि त्यांनी सुरुवातीला चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने पेमेंट केले त्यानंतर, जास्त कमिशन मिळविण्यासाठी आणि सुरुवातीची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी कॉलरने त्यांना पैसे देण्यास भाग पाडायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले.

काय घडले?

सौरभ वानखडे हे गुगलवर जॉब सर्च करीत होते. ते करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठविण्यात आली. लिंकवर क्लिक करून सौरभ यांनी जॉबबाबत संपूर्ण माहिती भरली. मात्र, पलिककडून जॉब उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. त्याच लिंकमध्ये एन्टरटेन्मेन्ट हे ऑपरेशन देण्यात आले. फिर्यादी यांनी ते निवडले असता बालाजी टेलीफिल्म ऑनलाईन रेटिंग व टास्कबाबत माहिती दिल्या गेली.

पुन्हा आली लिंक

अनोळखी मोबाईलधारकाने सौरभ वानखडे यांना पुन्हा एक लिंक पाठवून बॅंक अकाऊंटबाबत माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर मुव्ही रेटिंग, सिरिज रेटिंग, टास्क खेळण्याचे सुचविले. त्यापोटी कमिशन देण्याचे आमिष देखील दिले. पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून सौरभ यांना टास्क खेळण्यास प्रवृत्त करण्यात आले. वेगवेगळ्या अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगून यात त्यांची २ लाख ५९ हजार ६१४ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

Web Title: One click and Saurabh lost 2.60 lakhs; Cheating in the name of movie rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.