सोनेगावात एकाचा मृत्यू, ४३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:58+5:302021-04-15T04:12:58+5:30
४५ वर्षांतील अधिक रुग्ण धामणगाव रेल्वे : तालुक्यातील सोनेगाव खर्डा येथील एका ४७ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर ...
४५ वर्षांतील अधिक रुग्ण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील सोनेगाव खर्डा येथील एका ४७ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर एकाच दिवशी या गावात तब्बल ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात ४५ वर्षे वयोगटातील अधिक रुग्णांचा समावेश आहे.
धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार ग्रामीण भागात अधिक सुरू आहे. हिरपूर, चिंचोली, जाणकापूर या गावानंतर सोनेगाव खर्डा या गावात कोरोनाचा उद्रेक झाला. मागील आठ दिवस सर्दी, खोकला, अंग दुखी असा आजार असताना योग्य पद्धतीने औषधोपचार न घेतल्यामुळे ४७ वर्षीय इसमाचा गावातच मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचणीत हा इसम पॉझिटिव्ह आढळला होता. दरम्यान निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेतलेल्या कोरोना चाचणीत सर्वाधिक ४३ रुग्ण एकाच दिवशी कोरोना बाधित आढळले. यात ५४ वर्षांआतील अधिक रुग्ण आहे. दुसरी लाट झपाट्याने पसरत असल्याने सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी केले आहे.