एका संचालकांचा खुलासा सादर, २३ जणांची प्रतीक्षा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:12+5:302021-09-16T04:18:12+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुंतवणुकीबाबत चाचणी लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या बाबींसंदर्भात संचालक रवींद्र गायगोले यांनी खुलासा सादर केला ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुंतवणुकीबाबत चाचणी लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या बाबींसंदर्भात संचालक रवींद्र गायगोले यांनी खुलासा सादर केला आहे. मात्र, २३ संचालकांनी अद्यापही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे सप्टेंबर महिनाअखेर याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल सहकारी संस्थेच्या जिल्हा विशेष लेखापरीक्षकांमार्फत अहवाल विभागीय सहनिबंधकांना पाठविला जाणार आहे.
सहकारी संस्थेच्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सुनीता पांडे यांनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह २३ संचालक, तीन सनदी लेखापालांना चाचणी लेखापरीक्षणात बॅंकेच्या गुंतवणुकीबाबत निदर्शनास आलेल्या बाबींचा मुद्देनिहाय सप्रमाण खुलासा सात दिवसांत सादर करण्याचे नोटीसद्वारे कळविले होते. परंतु, एकमात्र रवींद्र गायगोले वगळता अन्य कुण्या संचालकाने खुलासा सादर केला नसल्याची माहिती आहे.
-------------
सर्व संचालकांना एकाच वेळी नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात आले आहेत. मात्र, रवींद्र गायगोले वगळता कुणीही खुलासे पाठविले नाही. मात्र, याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सप्टेंबरअखेर विभागीय सहनिबंधकांना पाठविण्यात येणार आहे.
- सुनीता पांडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, अमरावती.