पश्चिम विदर्भात दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:58+5:302021-07-20T04:10:58+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोनाकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, याची फारशी चर्चा झाली नाही. अस्मानी व सुल्तानी ...

One farmer commits suicide every nine hours in West Vidarbha | पश्चिम विदर्भात दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या

Next

गजानन मोहोड

अमरावती : कोरोनाकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, याची फारशी चर्चा झाली नाही. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. दर दोन दिवसांत पाच, तर दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामध्ये वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घर संसार कसा करावा, या शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. नापिकीच्या दुष्टचक्रात खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याने पोशिंद्याचा धीर खचून तो मृत्यूचा घोट घेत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाची अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये शासनाद्वारे अनेक योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बॉक्स

२००१ पासून १६,८४८ शेतकरी आत्महत्या

विभागामध्ये १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आली. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ३९० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

बॉक्स

शेतकरी आत्महत्यांची स्थिती (जूनअखेर)

महिना २०१९ २०२० २०२१

जानेवारी ७७ ८३ ७८

फेब्रुवारी ७३ ९७ ७२

मार्च ८२ ५९ ८९

एप्रिल ७१ ५१ ६४

मे ९१ ११६ ७५

जून ८१ ९४ ८२

एकूण ४७५ ५०० ४६०

Web Title: One farmer commits suicide every nine hours in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.