शंभर फूट उंच तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:33+5:30

बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता, सिनिअर डिव्हीजन कमांडंट अजय दुबे, सिनिअर डीओएम स्वप्निल निला, डीईएन आर.पी. चव्हाण, डीसीएम अरुणकुमार, डीईई जनरल जी.एस. लखेरा, जयंत वानखडे, जितू दुधाणे, संजय हिंगासपुरे, आशिष गावंडे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला होती.

One hundred feet high Tiranga | शंभर फूट उंच तिरंगा

शंभर फूट उंच तिरंगा

Next
ठळक मुद्देअमरावती रेल्वे स्थानक : खासदारांकडून ध्वजारोहण, आरपीएफची सलामी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे १२ जवान व एक उपनिरीक्षक यांच्या पथकाने राष्ट्रगीतानंतर राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी भुसावळ आरपीएफचे बँड पथक हे विशेष आकर्षण ठरले.
बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता, सिनिअर डिव्हीजन कमांडंट अजय दुबे, सिनिअर डीओएम स्वप्निल निला, डीईएन आर.पी. चव्हाण, डीसीएम अरुणकुमार, डीईई जनरल जी.एस. लखेरा, जयंत वानखडे, जितू दुधाणे, संजय हिंगासपुरे, आशिष गावंडे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला होती.
२० फूट उंची, ३० फूट लांबी असलेला राष्ट्रीय ध्वज खास रेल्वेने तयार करून घेतला आहे. १०० फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभावर सदर ध्वज फडकत आहे. सदर झेंडा कायमस्वरूपी असून, रेल्वे स्थानक परिसरात फडकत राहणार आहे, हे विशेष! दुपारी ४ वाजताच्या सुमारास पार पडलेल्या या कार्यक्रमात परेड करून राष्ट्रध्वजाला सन्मापूर्वक सलामी दिली. त्या आरपीएफ पथकाचे नेतृत्व उपनिरीक्षक एच.एम. शहा यांनी केले. त्यांना वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे व निरीक्षक पी.के. भाकर यांचे मार्गदर्शन लाभले. या पथकात १२ सशस्त्र जवानांचा समावेश होता, तर भुसावळवरून खास अंबानगरीत आलेल्या आरपीएफच्या बँड पथकाचे नेतृत्व एस. बी. खोसे यांनी केले. ध्वाजारोहणानंतर खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. मॉडेल रेल्वेस्टेशनवर तिरंगा फडकत राहणे हे अमरावतीसाठी गौरवास्पद असून ते वैभव असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान रेल्वेस्थानक परिसरातच सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पाची पायाभरणी देखील खासदारांच्या हस्ते करण्यात आली.

तिरंगा ध्वज असलेले अमरावती दुसरे स्थानक
आतापर्यंत देशातील ७० रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज फडकत आहे. भुसावळ रेल्वे विभागामध्ये अमरावती हे दुसरे रेल्वे स्थानक आहे, जेथे १०० फुटांवर राष्ट्रध्वज फडकला आहे. यानंतर नाशिक व खंडवा या स्थानकांवर लवकरच तिरंगा हवेत झेपावेल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी‘ लोकमत’शी बोलताना सांगितले.
 

Web Title: One hundred feet high Tiranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.