शंभर रुपयांचे मुद्रांक ११० रुपयांना विक्री (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:24+5:302021-06-16T04:16:24+5:30

ग्राहकांचा नाईलाज : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी तहसीलमध्ये तुफान गर्दी इंदल चव्हाण अमरावती : येथील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध ...

One Hundred Rupee Stamp Sales for Rs. 110 (Revised) | शंभर रुपयांचे मुद्रांक ११० रुपयांना विक्री (सुधारित)

शंभर रुपयांचे मुद्रांक ११० रुपयांना विक्री (सुधारित)

Next

ग्राहकांचा नाईलाज : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी तहसीलमध्ये तुफान गर्दी

इंदल चव्हाण

अमरावती : येथील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त मुद्रांक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १०० रुपयांऐवजी नाइलाजास्तव ११० रुपये मोजावे लागले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनातर्फे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, १५ दिवसांपासून कोरोना संक्रमणाची स्थिती आटोक्यात आल्याने व ऐन खरीप हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून आजपासून अनलॉक करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठी गर्दी केली होती. मुद्रांक विक्रेत्यांनी त्याचा गैरफायदा घेत १०० रुपयांच. स्टॅम्प पेपर ११० रुपयांना विक्री केल्याचे निदर्शनास आले. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी अमरावती तहसील कार्यालयातून ८३२ मुद्रांकांची खरेदी करण्यात आली. यात शंभर रुपयांच. सर्वाधिक तर ५०० रुपयांच फार कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बॉक्स

बाजारपेठेत ग्राहक झाले सैराट

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी खरेदीकरिता ग्राहकांनी सैराट गर्दी केल्याचे दिसून आले. श्याम चौकातील सर्वच दुकांनामध्ये खरेदीकरिता रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून वाहने सैराट धावताना दिसून आले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात नियुक्ती केल्याचे दिसून आले.

कोट

१०० रुपयांचे मुद्रांक शासकीय रेटनुसार १०० रुपयांतच विकण्याचे निर्देश वाईंडरांना दिलेले आहेत. त्यासाठी त्यांना कमिशनदेखील ठरविण्यात आलेले आहेत. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एकूण ८३२ मुद्रांकांची विक्री झाली आहे.

- मनीष पलीकोंडवार,

प्रभारी सब रजिस्ट्रार, अमरावती तहसील

प्रतिक्रिया ग्राहकांच्या

मी १०० रुपयांचे पाच मुद्रांक खरेदी केले. वाईंडरला विचारणा केली असता, ११० रुपये प्रति मुद्रांक असे सांगण्यात आले. नाईलाजास्तव त्यांना ५५० रुपये द्यावेच लागले.

- अनिकेत प्र. खाडे,

उपसरपंच, शिराळा

-

वाईंडरला १०० रुपयांचे मुद्रांक मागितले असता ११० रुपये द्या, असे ते म्हणाले. उर्वरित काम लवकर व्हावे, यासाठी मी जास्तीचे १० रुपये नाईलाजास्तव वाईंडरला दिले.

- अनिकेत सु. बांबल, शेतकरी, शिराळा

Web Title: One Hundred Rupee Stamp Sales for Rs. 110 (Revised)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.