पुणे येथेे शंभर नमुने पाठविणार जनुकीय तपासणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:32+5:302021-02-20T04:36:32+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. रुग्णवाढीचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तब्बल १०० रुग्णांचे नमुने ...

One hundred samples will be sent to Pune for genetic testing | पुणे येथेे शंभर नमुने पाठविणार जनुकीय तपासणीला

पुणे येथेे शंभर नमुने पाठविणार जनुकीय तपासणीला

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. रुग्णवाढीचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तब्बल १०० रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत जनुकीय तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. यात ‘कोरोना पॉकेट’ भागातील रुग्णांचे नमुने असणार आहे.

फेब्रुवारीपासून कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीचा आलेख वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना पॉझिटिव्ह रुग्ण कमी होताना दिसत नाही. त्रिसूत्रीची अंमलबजवाणी, कोरोना संक्रमित गृह विलिगीकरणातील रुग्णांवर करडी नजर ठेवली जात आहे. मात्र, आता जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या भागातील नमुन्यांच्या तपासणीला प्राधान्य दिले जात आहे. त्याअनुषंगाने शासकीय, खासगी रुग्णालयातील नमुने गोळा करण्यात आले असून, पुढे दोन दिवसांत हे नमुने पुणे येथे तपासणीला पाठविले जातील, अशी माहिती आहे.

--------------

या ठिकाणचे गोळा केले नमुने

अचलपूर उपजिल्हा रूग्णालय, देवमाळी,कांडली, गुरुदेवनगर मोझरी, अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, ॲक्झॉन हाॅस्पीटल.

---------------

कोट

जिल्ह्यातून सुमारे १०० नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेत जनुकीय तपासणीसाठी पाठविले जातील. या नमुन्यांचा अहवाल पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.

- रेवती साबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

Web Title: One hundred samples will be sent to Pune for genetic testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.