चिंचोलीची ‘कपिला’ लाखात एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:05 PM2019-06-29T23:05:40+5:302019-06-29T23:06:52+5:30
चिंचोलीची ‘कपिला’ दररोज पान्हावते. २७ वर्षांपासून ती दूध देत आहे. या काळात हरतºहेचे प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होऊ शकली नाही. कोट्यवधीत एक अशा या गायीमुळे तिचे मालक लुनकरण गोपीलाल गांधी आणि त्यांचे गाव चिंचोली हे चर्चेचा विषय ठरले आहेत.
चेतन घोगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : चिंचोलीची ‘कपिला’ दररोज पान्हावते. २७ वर्षांपासून ती दूध देत आहे. या काळात हरतºहेचे प्रयत्न करूनही तिची गर्भधारणा होऊ शकली नाही. कोट्यवधीत एक अशा या गायीमुळे तिचे मालक लुनकरण गोपीलाल गांधी आणि त्यांचे गाव चिंचोली हे चर्चेचा विषय ठरले आहेत.
लुनकरण गांधी यांंच्या गुरांच्या गोठ्यात त्यांच्याच घरातील एका गाईने १९८७ मध्ये एक गोंडस पिलाला जन्म दिला. तिचे नाव कपिला ठेवण्यात आले. या गावरान जातीच्या कपिलाला पाच वर्षांची असताना सर्वप्रथम भरण्यासाठी गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ु खाजगी डॉक्टरांना दाखवण्यात आले. पण, तिला तेव्हापासून गर्भ राहिलेला नाही तो आतापर्यंत. गांधी कुटुंबीयांकडून तिला गावातीलच रमेश पाठक या व्यक्तीने गर्भधारणा होण्यासाठी औषध असल्याचे सांगून नेले. तथापि, कपिलाला गर्भधारणा होत नसल्याचे पाहून अखेर रमेश पाठक यांनी ती विक्रीला काढली. लुनकरण गांधी यांना माहिती मिळताच ५०० रुपये व दुसऱ्या गाईचे वासरू देऊन त्यांनी ती परत मिळविली.
दरम्यान, गांधी कुटुंबाकडे परत येताच कपिलाला आपोआप पान्हा फुटला. लुनकरण गांधी यांनी स्वत: दूध काढण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम दीड लिटर चिकाचे दूध देऊन नंतर काही दिवसांत चांगले दूध देण्यास सुरुवात केली. तथापि, वांझ गाईचे दूध योग्य की अयोग्य, या पेचामुळे ते गुरांच्या रक्षणासाठी पाळलेल्या कुत्र्यांना दिले जात असे. २०१० मध्ये गांधी यांची मुलगी गीताबाई कलंत्री (रा. आमगाव) यांनी मथुरा येथील गोरक्षणाला भेट देऊन गाईची कहाणी सांगितली. संचलकांनी ही गाय स्वखर्चाने मथुरेला आणण्याची इच्छा व्यक्त केली तसेच दूध व गोमूत्र आरोग्यदायी असल्याचा हवाला दिला. यानंतर कपिलाच्या दुधाचे गांधी कुटुंबीयांत सेवन सुरू झाले.
अशा गार्इंची इतिहासात नोंद
गर्भधारणा न राहता दूध देणारी गाय यापूर्वी गजानन महाराज देवस्थान (शेगाव) व परशराम महाराज (पिंपळोद) यांच्याकडे त्या काळात असल्याची इतिहासात नोंद आहे.
हार्मोनल इम्बॅलन्समुळे ही गाय नेहमी दूध देते. अशा स्थितीत गाईच्या गर्भधारणेचा व दुधाचा काही एक संबंध नसतो. अशा गाय लाखांत एखादी असते.
- पी.एन. ठाकूर, पशुधन विकास अधिकारी, अंजनगाव सुर्जी