अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची जबर धडक; एक ठार, २७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 02:53 PM2022-04-06T14:53:48+5:302022-04-06T16:52:52+5:30

ही बस यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून अमरावतीला जात होती, दरम्यान नांदगाव खंडेश्वर खंडेश्वर जवळील शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात घडला.

one killed, 17 injured in Bus-truck collision on Amravati-Yavatmal route | अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची जबर धडक; एक ठार, २७ जखमी

अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची जबर धडक; एक ठार, २७ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वर जवळील शिंगणापूर चौफुलीवर अपघात

अमरावती : अमरावती-यवतमाळ मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर २७ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही घटना आज (दि. ६) सकाळी ११ वाजता घडली.

ही बस यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून अमरावतीला जात होती, दरम्यान नांदगाव खंडेश्वरजवळील शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात घडला. चौफुलीवरून धीम्या गतीने जाणाऱ्या एसटीला औरंगाबादहून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली व सुमारे पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. या धडकेनंतरही चालकाने एसटीचे संतुलन कायम ठेवत ती रस्त्याच्या खाली सुरक्षित उतरविली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

जखमींना नांदगाव खंडेश्वर व नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील १४ प्रवाशांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पैकी तिघे गंभीर जखमी असून एका प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पांडुरंग बोडखे (७४, रा. कवठा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती कळताच ठाणेदार हेमंत ठाकरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवनी, शिंगणापूर व नांदगाव खंडेश्वर येथील बरेच सामाजिक कार्यकर्ते अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा नोंदविण्यची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.

अपघातातील जखमींची नावे

प्रशिक खडसे (रा. पाथ्रट गोळे), पार्वताबाई पोहनकर (रा. पिंपरी कलंगा), मुमताज बेगम (रा. अमरावती), अरुणाबाई अमुने (रा. पुसद), अनिकेत राठोड (रा. पुसद), कुसुम पोहनकर (रा. शिंगणापूर), प्रियंका दायमा (रा. पुसद), वनिता खडसे (रा. पाथ्रट गोळे), पंडित कंडेल (रा. महागाव), वनिता मेश्राम (रा. मालखेड), प्रेमदास चव्हाण, चेतन छागाणी (रा. दारव्हा), सारिका भिडेकर (रा. बडनेरा), अश्विन जाधव (रा. पुसद), सिद्धार्थ धुळे (रा. पुसद), शालिनी गुजर, बाळकृष्ण काळे (रा. शेंद्री डोलारी), विजय पत्रे (रा. पुसद), तुषार भीडेकर (रा. बडनेरा), नरेश छांगाणी (रा. दारव्हा), वसंत वहाने (रा. दिघी कोल्हे), सुरेश इंगळे (रा. पुसद), साक्षी उंबरकर (रा. पुसद) अशी जखमींची नावे आहेत.

Read in English

Web Title: one killed, 17 injured in Bus-truck collision on Amravati-Yavatmal route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.