एक लाख १८ हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:58+5:302021-03-27T04:13:58+5:30
अमरावती : शहरात अवैध गांजा दाखल होत असल्याची माहिती गतस्ती दरम्यान पोलीस पथकाला मिळताच सापळा रचून माेर्शी मार्गावर वेलकम ...
अमरावती : शहरात अवैध गांजा दाखल होत असल्याची माहिती गतस्ती दरम्यान पोलीस पथकाला मिळताच सापळा रचून माेर्शी मार्गावर वेलकम पॉईंटजवळून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १ लाख १८ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री केली.
पोलीससूत्रानुसार, एजाज खान छोटे खान (३९, रा. गुलीस्तानगर अमरावती), शेख नय्यर शेख भुरू (३०, रा. गुलीस्तानगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. दोन आरोपींपैकी एकाच्या हातात एक कथीया रंगाची लगेज बॅग होती. त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन एजाज खान याची झडती घेतली. त्याच्या ताब्यातून १० किलो १८१ गॅम वजनाचा १ लाख १८०० रुपयांचा गांजा मिळून आला. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम २०(ब)२२(ब) गुंगीकारक औषधे द्रव्ये, व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंदविला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, डीसीपी शशीकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व डीबीच्या पथकाचे शेखर गेडाम, देशमुख, रोशन वऱ्हाडे, उमेश भोपते, चालक पांडूरंग बुधवंत यांनी केली.