एक लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण कवच?

By admin | Published: November 20, 2014 10:42 PM2014-11-20T22:42:41+5:302014-11-20T22:42:41+5:30

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना खरीप-२०१४ हंगामासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. ६० ते ८० टक्के जोखीमस्तर असलेल्या या योजनेत

One lakh farmers get protection for crop insurance? | एक लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण कवच?

एक लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण कवच?

Next

गजानन मोहोड - अमरावती
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना खरीप-२०१४ हंगामासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. ६० ते ८० टक्के जोखीमस्तर असलेल्या या योजनेत आपत्तीची नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर असली तरी जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसेच असल्याने एक लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपात असणाऱ्या १ लाख ७७७ शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजारांचा विमा हप्ता भरला आहे. या शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळू शकते. सन १९९९-२००० हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकांकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी या शेतकऱ्यांचे प्रस्ताव भारतीय कृषी विमा कंपनीकडे सादर करणे अनिवार्य आहे.

Web Title: One lakh farmers get protection for crop insurance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.