एक मोबाईल, दोन मुले, ऑनलाईन शिक्षण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:29+5:30
कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पालकांच्या मोबाईलवर गुहपाठ पाठवून नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित केल्यानंतर शासनस्तरावर पालकांकडूनही कौतुक झाले. पाल्यांच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही, हे ओळखून पालकांनी सुरक्षिततेवर भर दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनासह शिक्षण संस्थांनी ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण अनेक शासकीय, खासगी शाळांमधील पालकांना मोबाईल घेणे परवडत नसल्याने 'हाती नाही मोबाईलची कळ अन् ऑनलाईनसाठी पळ' अशी अवस्था झाली आहे. अशा शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग कसे होणार, असा प्रश्न आहे. उपलब्ध साधनसामग्रीशिवाय ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या निर्णयामुळे पालकांसह शिक्षकांचे हाल होऊ लागले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पालकांच्या मोबाईलवर गुहपाठ पाठवून नंतर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित केल्यानंतर शासनस्तरावर पालकांकडूनही कौतुक झाले. पाल्यांच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही, हे ओळखून पालकांनी सुरक्षिततेवर भर दिली. पण वारंवार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा उल्लेख करून ऑनलाईन वर्ग भरण्याचा मार्ग सुरू करण्याच्या मानसिकतेत असलेल्या शासनाला पालकांमध्ये असलेला गोंधळ अद्यापही स्पष्ट दिसत नाही.
मोबाईलवर शिक्षकांनी पाठवलेले व्हिडीओ बघा आणि मुलांना अभ्यास करायला सांगा ना! यात घरात एकच मोबाईल दोन मुले, अशी कौटुंबिक रचना असल्यामुळे मोबाईल कुणाकडे द्यायचा आणि त्यावर कुणी अभ्यास करायचा, या विचारातच पालकांचा वेळ वाया जात आहे. त्यातच मोठा मुलगा किंवा मुलगी नववी दहावीला शिकत असेल तर साहजिकच त्यांना प्राधान्य दिले जाते.
मोबाईलला रेंज नाही!
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होते. पाऊस आणि वाºयामुळे येथे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचा ग्रामीण भागात फायदा नाही.
ग्रामीण पालकांची मोबाइल घेण्याची ऐपत नाही. अशा स्थितीत ज्याकडे सुविधा त्यांनाच याचा फायदा होतो.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे अडचणींमुळे नुकसान होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण नुकसानाचे ठरते.
- मोहन बैलके
शिक्षक