मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन, एक उत्पादन’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 04:31 PM2023-11-27T16:31:42+5:302023-11-27T16:32:08+5:30

स्थानिक पातळीवर ६१ विविध लोकप्रिय उत्पादनाची विक्री, अमरावतीच्या सांभारवडीची रेल्वे प्रवाशांना घेता येते चव

'One Station, One Product' at 79 Railway Stations of Central Railway | मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन, एक उत्पादन’

मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन, एक उत्पादन’

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘वोकल फॉर लोकल’ व्हिजनला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ७९ रेल्वे स्थानकावर ६१ प्रकारच्या लोकप्रिय वस्तू, साहित्य विक्री नोंदणीकृत ओएसओपी केंद्रावर होत आहे. लाभार्थ्यांनी आतापर्यंत २.४६ कोटीचे उत्पन्न मिळवले आहे.

केंद्र सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’ व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक/स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकावर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना सुरू केली होती. योजनेची सुरुवात २५ मार्च २०२२ रोजी सुरू झाली आणि २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण राज्यात ७४ रेल्वे स्थानकांवर ७९ ओएसओपी आउटलेट्सने आहेत. हे ओएसओपी स्टॉल्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद यांनी संपूर्ण रेल्वेमध्ये एकरूपतेसाठी डिझाइन केले आहेत.

स्थानिक वस्तू, साहित्य विक्री

‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ हे त्या-त्या ठिकाणासाठीचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक लोकांनी बनवलेल्या कलाकृती, विणकरांचे हातमाग, जगप्रसिद्ध लाकूड कोरीव काम, चिकनकारी आणि झारी-जरदोजी हस्तकला, कपड्यांवरचे काम किंवा चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले मसाले यांचा समावेश आहे. अर्ध-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, उत्पादने या भागात स्वदेशी उगवले जातात. त्याच वस्तू, साहित्याची विक्री केली जाते.

अमरावतीची सांभारवडी, शेगावच्या उदबत्तीची विक्री

राज्यातील रेल्वे स्थानकांवर विविध उत्पादनांमध्ये अहमदनगरची केळी, द्राक्षे, पापड, लोणचे; अमरावतीची सांबरवडी; सीएसटी मुंबई येथे चामड्याची उत्पादने; चिंचवड येथील घरगुती अगरबत्ती, धूप, साबण, फिनाइल; चर्चगेट येथील चामड्याची उत्पादने; गोरेगाव येथील खादी उत्पादने; इगतपुरी येथील फळे आणि पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणचे, पापड यासह हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पल; कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी; लोणावळा येथे चिक्की, नाशिकरोड येथील पैठणी साड्या; पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती, कुमकुम, अगरबत्ती, नागपूर येथील बांबूचे साहित्य; परळ येथील टेक्सटाइल आणि हातमाग; पिंपरी येथे हॅन्डमेड पर्स बॅग; सातारा येथील कंदी पेढा; शेगाव येथील पापड; सोलापूर येथील चादर, बेडशीट आणि टॉवेल; वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला; वसई रोड आणि नालासोपारा येथे सॉफ्ट टॉइज यांचा समावेश आहे.

Web Title: 'One Station, One Product' at 79 Railway Stations of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.