अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

By गणेश वासनिक | Published: November 2, 2023 03:46 PM2023-11-02T15:46:53+5:302023-11-02T15:48:34+5:30

३९ पदव्युत्तर विभाग, गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाखांचा खर्च, जनरल फंडातून खर्च

One student and eight professors in computer science PG of Amravati University? | अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पदव्युत्तर (एमई) विभागात एकच विद्यार्थी प्रवेशित असून, आठ घड्याळी तासिका प्राध्यापक नियुक्ती करण्यात आले आहेत. यंदा शिक्षण पीजी विभागात प्रथम वर्षासाठी एकही प्रवेश झाला आहे. मात्र गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाख ४१ हजार रुपये खर्च झाले आहे. हा सर्व खर्च विद्यापीठाच्या जनरल फंडातून केला जात असल्याने स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठात एकूण ३९ पदव्युत्तर विभाग आहे. यामध्ये ११ विभाग हे विनाअनुदानित असून, त्या विभागाचा खर्च जनरल फंडातून केला जातो. विद्यापीठाच्या एकूण विभागात १४८२ विद्यार्थीशिक्षण घेत असून, यात अनुदानित विद्यार्थी १०७६, विनाअनुदानित विद्यार्थिसंख्या ४०६ एवढी आहे. त्यातही सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागात प्रथम वर्षात एकही विद्यार्थी प्रवेशित नाही. तर संगणकशास्त्र एमईमध्ये एकच विद्यार्थी प्रवेशित आहे. तर घड्याळी तासिका प्राध्यापकांच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२३ या तीन महिन्यात वेतनावर चक्क ६,५९,४,१७५ इतकी रक्कम जनरल फंडातून खर्च झाली आहे.

संगणकशास्त्र एमई, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर या विभागांतही हे घड्याळी तासिका आठ प्राध्यापक शिकवणीचे काम करतात. एकाच संगणकशास्त्र एमई विभागासाठी ते नाहीत. तसेच पीजी डिप्लाेमा, एमसीएला सुद्धा ते शिकवतात.

- डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: One student and eight professors in computer science PG of Amravati University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.