एकाचे निलंबन, तिघांची वेतनकपात

By admin | Published: April 20, 2017 12:05 AM2017-04-20T00:05:54+5:302017-04-20T00:05:54+5:30

नजीकच्या कठोरा आणि अंगोडा येथील दोन शाळांना दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान डेप्युटी सीईओंना दोन्ही शाळांमधील शिक्षक अनुपस्थित आढळून आल्याने ...

One suspension, three pay scales | एकाचे निलंबन, तिघांची वेतनकपात

एकाचे निलंबन, तिघांची वेतनकपात

Next

शिक्षकांना हलगर्जीपणा भोवला : डेप्युटी सीईओंची कारवाई
अमरावती : नजीकच्या कठोरा आणि अंगोडा येथील दोन शाळांना दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान डेप्युटी सीईओंना दोन्ही शाळांमधील शिक्षक अनुपस्थित आढळून आल्याने एकाचे निलंबन तर तिघांची एकदिवसाची वेतनकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी ८ वाजता हा प्रकार घडला.
डेप्युटी सीईओंनी बुधवारी सकाळी ८ वाजता या दोन्ही शाळांना आकस्मिक भेट दिली. कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील चारपैकी तीन शिक्षक शाळेत वेळेत उपस्थित नसल्याने या शिक्षकांवर एकदिवसाच्या वेतनकपातीची कारवाई करण्यात आली तर अंगोडा येथील दोनशिक्षकी शाळा पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उघडली होती आणि दोन्ही शिक्षक शाळेत हजर नव्हते. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे.
अंगोडा येथील शाळेबाबत नागरिकांची लेखी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. याची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे व गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांनी १९ एप्रिल रोजी दोन्ही शाळांची आकस्मिक तपासणी केली.कठोरा येथील शाळेतील चारपैकी तीन शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याने त्या तिघांची एकदिवसाची वेतनकपात करण्याची कारवाई करण्यात आली तर अंगोडा येथील दोन शिक्षकी शाळेबाबत नागरिकांची तक्रार असल्याने येथेही डेप्युटी सीईओंनी भेट दिली असता पोषण आहार कर्मचाऱ्यांनी शाळा उघडल्याचे दिसून आले. दोन्ही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते. याशिवाय विद्यार्थी सुद्धा शाळेत हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील दोन्ही शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची शिफारस सीईओंकडे केल्याचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे व गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

सहायक प्रशासन अधिकारी निलंबित
सध्या पंचायत समितीस्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. या कामाची सुद्धा आकस्मिक पाहणी मंगळवारी डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांनी केली. यावेळी तेथे कार्यरत सहायक प्रशासन अधिकारी पारधी यांचे प्रशासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Web Title: One suspension, three pay scales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.