ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; महामानवाच्या जीवनावरील एक हजार लेख, दुर्मिळ फोटोंचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 02:46 PM2022-04-14T14:46:09+5:302022-04-14T14:48:41+5:30

ध्येयवेड्या युवकाने बाबासाहेबांच्या जीवनावरील एक हजार लेखांचे तसेच दोन हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन केले आहे. फोटो - मोहन १३ वाय

One thousand articles on the life of a great man, a collection of two thousand rare photos | ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; महामानवाच्या जीवनावरील एक हजार लेख, दुर्मिळ फोटोंचे संकलन

ध्येयवेड्या तरुणाचा अनोखा उपक्रम; महामानवाच्या जीवनावरील एक हजार लेख, दुर्मिळ फोटोंचे संकलन

Next
ठळक मुद्देदिलीप महात्मे यांचा अनोखा उपक्रम

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं, हे शिकवेल, हा भारतरत्नांचा विचार मनात ठेवत तालुक्यातील एका ध्येयवेड्या युवकाने बाबासाहेबांच्या जीवनावरील एक हजार लेखांचे तसेच दोन हजारांहून अधिक दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन केले आहे.

तालुक्यातील पेठ रघुनाथपूर हे दीड हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव. यातील दिलीप वसंत महात्मे या युवकाने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. आज त्याच्याकडे बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ वृत्तपत्रापासून तर प्रसिद्ध पुस्तकातील लेखांचे संकलन आहे. ‘तुझेच चक्र फिरे जगावरी’ असे ७१० पानांचे पुस्तक आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ३१० लेख यात आहेत. दिलीपकडे २ हजार १०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. शंभरपेक्षा जास्त कविता त्याच्याकडे संकलित आहेत.

बाराव्या वर्षी जोपासला छंद

दिलीप महात्मे यांनी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व जीवनपट आधारित माहिती संकलित केली. त्यानंतर विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, जीवनपट, कविता व छायाचित्रांचे संकलन केले. यासोबतच वयाच्या बाराव्या वर्षांपासून दिलीप महात्मे यांनी विविध विषयांवरील २९ विशाल खंड संकलित केले आहेत. जगातील सर्व देशातील नाणी दिलीप महात्मे यांच्याकडे पाहायला मिळतात.

Web Title: One thousand articles on the life of a great man, a collection of two thousand rare photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.