शहर हद्दीतील मतदान केंद्रावर राहणार एक हजार पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:24+5:302021-01-14T04:12:24+5:30

शहर हद्दीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता पोलीस आयुक्त आरती सिंह, तीन डीसीपी यांच्या मार्गदर्शनात तीन सहायक पोलीस आयुक्त, १२ ...

One thousand policemen will be deployed at the polling stations in the city limits | शहर हद्दीतील मतदान केंद्रावर राहणार एक हजार पोलीस तैनात

शहर हद्दीतील मतदान केंद्रावर राहणार एक हजार पोलीस तैनात

Next

शहर हद्दीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता पोलीस आयुक्त आरती सिंह, तीन डीसीपी यांच्या मार्गदर्शनात तीन सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ४१ सहायक पोलीस उपनिरीक्षक,६०४ पोलीस अंमलदार, १२५ सैनिक, २ प्लाटून दंगा नियंत्रण पथक, १ जलद प्रतिसाद पथक कर्तव्यावर तैनात राहणार आहे. तसेच मतदान केंद्रानिहाय पोलिसांची गस्त तसेच पोलीस सेक्टर पेट्रोलिंगची आखणी सुद्धा करण्यात आली आहे.

बॉक्स:

तरुणांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणांनी सक्रिय होताना कुठल्याही भूलथापांना तसेच प्रलोभनाला बळी पडू नये, स्थानिक पातळीवर कोणत्याही अनुचित प्रकारामध्ये किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. युवकावर दाखल गुन्ह्यांची नोंद ही पोलीस रेकॉर्डवर येते. दाखल गुन्ह्याची माहिती ही चरित्र प्रमाणपत्रावर नोंद होत असल्याने भविष्यामध्ये चांगल्या संधीपासून युवकांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. म्हणून कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनाही पोलिसानी केले.

बॉक्स:

मास्कचा वापर करणे अनिवार्य

जिल्ह्यात भयमुक्त वातावरण असून नागरिकांनी स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात मतदान करावे, कोविड १९ चा धोका अद्यापही टळलेला नाही. नागरिकांनी मतदान करताना मतदान केंद्रावर गर्दी टाळून शारीरिक अंतर ठेवून मास्कचा वापर करावा असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले.

बॉक्स:

सोशल मीडियावर सायबर पोलिसांची नजर

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही व्यक्तींनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिस्थिती निर्माण केल्यास त्याची गय केली जाणार नाही. अशा सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. तसेच सोशल मीडियावर सुद्धा सायबर पोलिसांची नजर असून आक्षेपार्ह पोस्ट, संदेश निर्मित करणे, प्रसारित करणे, पुढे पाठविणे टाळावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

Web Title: One thousand policemen will be deployed at the polling stations in the city limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.