पाच गंभीर आजारावर एकच लस
By admin | Published: November 24, 2015 12:19 AM2015-11-24T00:19:23+5:302015-11-24T00:19:23+5:30
पाच गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आता पेंटाव्हॅलंट ही एकच लस दिली जाणार आहे.
पेंटाव्हॅलंट लस : आरोग्य विभागाव्दारा शुभारंभ
अमरावती : पाच गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आता पेंटाव्हॅलंट ही एकच लस दिली जाणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाव्दारा सोमवार २३ नोव्हेंबरपासून सर्व जिल्हा व तालुका रुग्णालयात तसेच प्राथमिक आणि आरोग्य उपकेंद्रात ही लस मोफत सुरू केली आहे.
डांग्य खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ ब, या आजाराच्या प्रतिबंधासाठी बाळांना दीड १, अडीच व साडेतीन महिन्यांनी इंजेक्शनव्दारे त्रिगुणी लसीचा डोस दिला जातो. याशिवाय मेंदूज्वर आणि कावीळ या आजाराच्या प्रतिबंधाची लस स्वतंत्र इजेक्शनव्दारे द्यावी लागत होती. त्यामुळे बाळाला एकूण सहावेळा इंजेक्शनने टोचावे लागत असल्याने कोवळ्या शरीरावर इंजेक्शनने खूप त्रास होत असतो.