अमरावती जिल्ह्यातील मार्डा गावात ४५० एकरात कांदा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:00 PM2021-02-08T15:00:48+5:302021-02-08T15:02:25+5:30
Amravati News तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेणा?्या मार्डा गावात यंदा ४५० एकरात या पिकाची लागवड करण्यात आली आहे.
Next
ठळक मुद्देउत्पादनही बंपरगाव ठरले आगार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेणा?्या मार्डा गावात यंदा ४५० एकरात या पिकाची लागवड करण्यात आली आहे.
मार्डा हे अल्पावधीत कांदा लागवड व बंपर उत्पादनासाठी प्रसिद्ध झाले आहे. येथील प्रत्येक शेतकरी दोन ते चार एकरापर्यंत कांदा लागवड करतो. कांदा लागवडीकरिता बाहेरून मजूर आणले जातात. जानेवारी महिन्यापासून येथे कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे. एकरी २ ते २.५० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले जाते. कांदा उत्पादनाने गावाला समृद्ध केले आहे. तरुणाईदेखील कांदा लागवडीकडे सरसावली आहे.