सातशे रुपयांनी वधारला कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:40 AM2019-06-17T01:40:02+5:302019-06-17T01:40:30+5:30

कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा कांदा सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणार, हे नक्की!

Onion prices rose by Rs 700 to Rs | सातशे रुपयांनी वधारला कांदा

सातशे रुपयांनी वधारला कांदा

Next
ठळक मुद्देकिरकोळ बाजारात ४० रूपये : यंदा कांदा आणणार डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांद्याचे भाव दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून, क्विंटल मागे सातशे रुपयांनी दर वधारल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याने व आणखीन भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा कांदा सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणार, हे नक्की!
अमरावती कृषिउत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजी मंडईत गावरान कांद्याची आवक ही ५०० क्विंटलपेक्षा अधिक झाली आहे. त्या कांद्याला ६०० ते २४४० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. १५०० ते १७०० रुपये प्रति क्विंटलवरून कांदा थेट २४०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. सरासरी दोन आठवड्यांतील ही क्विंटल मागे ७०० रूपयांची दरवाढ आहे. त्याकारणाने आवक जरी कमी होत असली तरी स्थानिक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, चांगल्या प्रतिचा कांदा किरकोळ व्यावसायिक ठोकमध्ये २० ते २४ रुपयांनी खरेदी करीत असेल तरी भाजीविक्रेता त्यातून दामदुप्पट भावाने विक्री करून शंभर टक्के नफा कमावत असल्याचे सर्वश्रृत आहे. ठोक भाजी मंडईत २० ते २४ रुपये प्रतिकिलोचा कांदा किरकोळ व्यावसायिक ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. किरकोळ भाजीविक्रेता प्रत्येक भाजीपाल्यावर शंभर टक्के नफा कमावित आहे. अशा पद्धतीने ग्राहकांची नेहमीच लूट करण्यात येत आहे. आणखीन कांद्याचे भाव वाढणार असल्याची शक्यता ठोक कांदा विक्रेत्यांनी वर्तविली आहे. त्या कारणाने कांदा डोळ्यात पाणी आणणार आहे, हे नक्की!

इंदूरचा लाल कांदा अमरावतीत दाखल
इंदूरचा लाल कांदा अमरावतीत दाखल होत आहे. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांदा स्वस्त असल्याने हा कांदासुद्धा नागरिक विकत घेत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पांढऱ्या कांद्याला २०० रूपयांनी भाव कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कांद्याला २६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता, हे विशेष!

Web Title: Onion prices rose by Rs 700 to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा