एस.टी.चे ऑनलाॅईन बूकिंग अनेकांना ठाऊकच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:52+5:302021-08-25T04:17:52+5:30
कोरोना लाटेनंतर ; एसटी महामंडळाच्या बसना प्रवाशांचा प्रतिसाद अमरावती : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी ...
कोरोना लाटेनंतर ; एसटी महामंडळाच्या बसना प्रवाशांचा प्रतिसाद
अमरावती : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरली. त्यामुळे ऑनलाईन तिकीट आरक्षणाला प्रतिसाद मिळत आहे. गत दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणातत सरासरी ४० टक्के तिकिटाचे आरक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले आहे. त्यामुळे आता एसटीची तिकीट आरक्षणाची गाडी वेगाने धावू लागली आहे.
सर्वाधिक प्रवाशाच्या सोई सुविधेसाठी एसटी महामंडळाने आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाची कास धरली आहे. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांच्या साेईसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे, याकरिता एमएसआरटीसी मोबाईल रिझर्व्हेशन ॲप सुरू केले आहे. यासोबतच महामंडळाच्या वेबसाईटवरूनही आरक्षण करता येते. गेल्या वर्षभरात ऑनलाईन बूकिंगला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.
बॉक्स
असे करावे ऑनलाईन बूकिंग
१)मोबाईलद्वारे बूकिंग करताना प्रथम प्लेस्टोअरमध्ये जाऊन एमएसआरटीसी डाऊनलोड करा. त्यानंतर हे संकेतस्थळ उघडा त्यांतर सोर्स उपलब्ध होतील. त्यामध्ये शिवशाही, शिवनेरी आणि सर्व असे ऑप्शन येतील. त्यापैकी एका ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या बसचे आरक्षण किती, हे समजेल.
२) बूकिंग करताना प्रवासाची तारीख, वेळ टाकावी. त्यात महिला, ज्येष्ठ आणि आरक्षित आसन किती, हे दिसेल. आसनावर लाल रंग असेल, ती सर्व आसने आरक्षित असतील. त्यानंतर ज्यावर आपण क्लिक कराल. त्यावर आपले आसन आरक्षित होईल. त्यानंतर पेमेंट विविध डेबिट कार्डद्वारे आपण करू शकता. त्यासाठीही ऑप्शन येतात. पैसे भरल्यानंतर तिकीट कन्फर्म होतील.
कोट
महामंडळाकडून ही चांगली सोय केली आहे. पण, त्याचा वापर कसा करायचा, हे आम्हाला माहिती नव्हते. आता ही सुविधा कायम वापरेल.
- देवेंद्र बुरडे, प्रवासी
कोट
ऑनलाईन सुविधेमुळे घरबसल्या एसटीचे हव्या त्या ठिकाणाचे बूकिंग करता येते. ही सुविधा चांगली आहे. त्याचा वापर प्रवास करण्यापूर्वी यापुढे नियमित करेन.
- आशिष गावंडे प्रवासी
कोट
यापूर्वी अमरावती विभागात ऑनलाईन आरक्षणालासाठी अल्पसा प्रतिसाद होता. मात्र, कोरोनानंतर हा प्रतिसाद सकारात्मक होत आहे. विशेष म्हणजे, या सुविधेचा लाभ अमरावती मध्यवर्ती बसस्थानावर अधिक होत आहे.
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक
बॉक्स
वर्ष ऑनलाईन बूकिंग
२०१६ २९६०
२०१७ ३४०१
२०१८ ७७८१
२०१९ ३४५७
२०२० ३०८
२०२१ २१ जुलैपर्यंत २८१