ऑनलाईनचा आला कंटाळा ऑफलाईन शिक्षणच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:16+5:302021-01-01T04:09:16+5:30

अमरावती : कोरोनामुळे मार्चपासून बंद झालेल्या शाळा वर्ष संपले असतानाही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. मात्र, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असू ...

Online boredom is better than offline education | ऑनलाईनचा आला कंटाळा ऑफलाईन शिक्षणच बरे

ऑनलाईनचा आला कंटाळा ऑफलाईन शिक्षणच बरे

Next

अमरावती : कोरोनामुळे मार्चपासून बंद झालेल्या शाळा वर्ष संपले असतानाही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. मात्र, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले. प्रारंभी शाळांना अल्प प्रतिसाद मिळाला. पालकांनी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले. परंतु, विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाने कंटाळले असून, ऑफलाईन शिक्षणाला प्राधान्य देत ‘स्कूल चले हम’ असे म्हणत शाळांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ६६२ शाळांमध्ये २१ हजार २८७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शासनाकडे ३० डिसेंबर २०२० रोजी संबंधित माहिती पाठविली आहे. राज्य शासनाने कोरोनाचा नवा स्ट्रेन लक्षात घेता जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवले आहे. त्यामुळे जानेवारीपासून शाळा, महाविद्यालय सुरू होतील, या चर्चांना विराम मिळाला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांत विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी अधिक संख्येने येत आहेत. नववी ते बारावीपर्यंत शाळांत १९ डिसेंबर रोजी १३,१११ विद्यार्थीसंख्या असताना ३० डिसेंबर रोजी २१,३८७ वर पोहचली आहे. १० दिवसांत ८२७६ विद्यार्थी संख्या वाढली आहे. ही बाब ऑफलाईन शिक्षणासाठी जमेची बाजू ठरणारी आहे.

--------------------

कोट

पूर्वीपेक्षा अध्ययनासाठी शाळांमध्ये विद्यार्थी वाढत आहे. नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनाच प्रवेश असल्याने ऑफलाईन शिक्षणाकडे कल वाढत आहे. शासन गाईडलाईननुसार शाळांमध्ये शिक्षण दिले जात आहे.

- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, अमरावती

-----------------

३८ दिवसांत एकही विद्यार्थी संक्रमित नाही

२३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान ३८ दिवसांत एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आले नाही. यात नववी ते बारावीपर्यंत शाळांमध्ये कोरोना नियमावलींचे पालन करून ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी मास्कचा वापर, नियमित हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवण्यास प्राधान्य देत आहे.

---------------------

शाळांची वर्षअखेर स्थिती

तालुका शाळा विद्यार्थी

अमरावती ४५ १००९

भातकुली ३४ ८२४

दर्यापूर ५७ २०५६

अंजनगाव सूर्जी ३७ ५८८

अचलपूर ७५ २५२९

चांदूर बाजार ५० ३२७१

चिखलदरा २३ २४५

वरूड ५४ २७५६

धारणी ०० २५९

नांदगाव खंडे. ३२ ११९५

चांदूर रेल्वे २४ ९९२

धामणगाव रेल्वे ३१ १३५८

तिवसा २७ ८९५

मोर्शी ४६ १९२१

महापालिका १२७ १४८९

Web Title: Online boredom is better than offline education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.