युक्रेनमधील ‘त्या’ विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 05:00 AM2022-03-13T05:00:00+5:302022-03-13T05:00:54+5:30
लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्याने १३ विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील चार विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. यादरम्यान फेब्रुवारीपासून युक्रेन व रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युक्रेन-रशिया युद्धामुळे मायदेशी परतलेल्या १३ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, हा प्रश्न पुढे आला असतानाच संबंधित विद्यापीठाने यावर मार्ग काढला आहे. १४ मार्चपासून काही विद्यापीठांचे ऑनलाईन क्लास सुरू होत आहेत.
लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्याने १३ विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील चार विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. यादरम्यान फेब्रुवारीपासून युक्रेन व रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले.
विद्यापीठाच्या सूचनेने दिलासा
युक्रेनमधील युद्धस्थिती कधी निवळेल, हे अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत झाप्रोशिया, व्हिनितसिया या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मेल करून पुढील शिक्षण १४ मार्चपासून ऑनलाईन क्लासद्वारे होत असल्याचे सांगितल्याने दिलासा मिळाला आहे.
पुढे काय होणार, काहीच ठावूक नाही !
झाप्रोझिया स्टेट युनिव्हर्सिटीत सध्या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहोत. आमचे क्लासेस १४ मार्चपासून ऑनलाईन सुरू होत असल्याबाबत विद्यापीठाने कळविले आहे. - प्रणव भारसाकळे
युक्रेनमधील युद्धामुळे परतावे लागले, सध्या झाप्रोझिया स्टेट युनिव्हर्सिटीत चौथ्या वर्षाला आहे. १ एप्रिलपासून ऑनलाइन क्लासेस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
- तुषार गंधे
व्हिनितसिया मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रथम वर्षाला आहे. आमचे ऑनलाइन क्लासेस १४ मार्चपासून सुरू होत असल्याची सूचना विद्यापीठाद्वारा देण्यात आली.
- स्वराज पुंड