ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा

By प्रदीप भाकरे | Published: May 7, 2023 03:05 PM2023-05-07T15:05:56+5:302023-05-07T15:06:29+5:30

Amravati Crime News:

Online Fraud : No OTP, No Scan; Still lost 1.27 lakhs, business woman cheated | ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा

ऑनलाईन फसवणूक : ना ओटीपी, ना स्कॅन; तरीही गमावले १.२७ लाख, व्यावसायिक महिलेला गंडा

googlenewsNext

- प्रदीप भाकरे
अमरावती: ओटीपी शेअर न करता व क्युआर कोड स्कॅन न करताही एका महिलेच्या खात्यातून एकुण १ लाख २७ हजार २९७ रुपये डेबिट झाले. ८ ते ९ एप्रिलदरम्यान फसवणुकीची ही घटना घडली. याप्रकरणी एका महिला व्यावसायिकाच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी ६ मे रोजी दुपारी अज्ञाताविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. आपण कुणालाही ओटीपी शेअर केला नाही, कुठलाही ॲप डाऊनलोड केला नाही, क्युआर कोड स्कॅन केला नाही, किंवा कुण्या साईटला व्हिजिट दिली नाही, तरी देखील आपली रक्कम कपात कशी झाली, असा प्रश्न त्या महिलेने उपस्थित केला आहे.

यातील तक्रारकर्ती महिला ऑनलाईन कपडे व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या संबंधांने त्यांना कुरिअर बॉईजचे कॉल येत असतात. ५ एप्रिल रोजी वेगवेगळ्या सहा मोबाईल क्रमांकावरून तुमचे कुरिअर डिॲक्टिव्हेट झाले असून, ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर पाच रूपये पाठविण्याचे सुचविले गेले. मात्र, त्या महिलेने त्या लिंकवर पैसे पाठविले नाही. दरम्यान ८ एप्रिल रोजी त्यांच्या दोन बॅंक खात्यातून अनुक्रमे २७ हजार ९०० रुपये, ९९ हजार ३९६ रुपये व ३ हजार रुपये डेबिट झाले. महिलेने तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर लगेचच ९ एप्रिल रोजी देखील त्यांच्या खात्यातून ९९९९ रुपये व १९५६ रुपये परस्पर कपात झाले. आपलीे पुन्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा सायबर पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यावेळी त्यांना खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
 

महिलेसमोर प्रश्नांची मालिका
ओटीपी शेअर केला, केवायसीच्या नावावर बॅंक खात्याची माहिती शेअर केली. ओटीपी स्कॅन केला, तर फसवणूक होऊ शकते, तशा घटना घडल्या आहेत, हे तक्रारकत्या महिलेला ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी कुठल्याही लिंकवर क्लिक केले नाही. किंवा पाच रुपये म्हणजे क्षुल्लक बाब, असा विचार करून ते देखील पाठविले नाहीत. कुठल्या संकेतस्थळावर त्या गेल्या नाहीत, असे असताना आपल्या खात्यातून १.२७ लाख रुपये कपात होणे, ही बाब त्यांच्यासाठी धक्कादायक ठरली आहे

Web Title: Online Fraud : No OTP, No Scan; Still lost 1.27 lakhs, business woman cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.