लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 12:35 PM2022-04-18T12:35:13+5:302022-04-18T12:38:01+5:30

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे.

online fraud of 8.21 lakh in the name of kbc | लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

Next
ठळक मुद्देऑनलाईन फ्रॉड : केबीसीच्या नावावर ८.२१ लाखांनी फसवणूक

अमरावती : लिंकवर क्लिक केले अन् खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’ असा काहीसा घटनाक्रम सांगणारे अनेकजण सायबर पोलीस ठाण्याची पायरी चढू लागले आहेत. काल-परवा एका महिलेचे केबीसी लॉटरीच्या नावावर चक्क ८.२१ लाख रुपये गेले. त्यापूर्वी एका शेअर मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्याची ४ लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. अमुक बँकेतून बोलतो, तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड बँक खात्याशी संलग्न नाही, अशी बतावणी करून बँक खात्यातून परस्पर रक्कम वळती होण्याचे प्रकार वाढले आहेत. सोबतच क्युआर कोड स्कॅन करण्याची ट्रीक वापरून ऑनलाईन फसवणुकीचा गोरखधंदा तेजीत आला आहे. केवायसी वा अन्य कुठल्या ऑनलाईन खरेदीसाठी कुणी लिंक पाठविल्यास मोहात पडू नका, लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. अलीकडे या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

ही घ्या उदाहरणे

एकाने ओएलक्सवर वाहन विक्रीकरिता जाहिरात पाहिली. ते वाहन खरेदी करण्यासाठी व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने व्हॉटसॲप मेसेजद्वारे क्युआर कोड पाठवून स्कॅन करावयास सांगितले गेले. तो स्कॅन केल्याबरोबर बँक खात्यातून रक्कम डेबिट झाली.

प्रकरण २

मोबाईल वॉलेट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करावयाची आहे असे सांगून त्याकरिता क्युआर कोड स्कॅन करावयास सांगण्यात आला. एका अकाउंटवर पेमेंट करण्याची सूचना आली. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर खात्यातून पैसे कपात झाले.

प्रकरण ३

एका बड्या बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून केवायसीसाठी लिंक पाठविण्यात आली. लिंकवर क्लिक केले. त्यापुढे आणखी एक वेबसाईट उघडली गेली. त्यात बॅंकेचा खातेक्रमांक दर्शविण्यात आला. ती माहिती भरली असता बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर विड्रॉल झाली.

प्रकरण ४

केबीसीतून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची बतावणी करण्यात आली. त्यासाठी आधी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. २५ लाख रुपयांची लॉटरी ‘कॅश’ झालीच नाही. उलटपक्षी दिशाभूल करून महिलेच्या खात्यातून तब्बल ८ लाख २१ हजार रुपये कपात झाले.

हे करू नका, टाळा

जर एखाद्या पोस्टमध्ये रजिस्ट्रेशन किंवा इतर कारण्यासाठी पैसे मागत असतील तर हमखास ती फेक पोस्ट आहे. कोणतीच कंपनी बाँड किंवा डिपॉझिट, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पैसे मागत नाही. क्रेडिट कार्ड डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारखी खासगी माहिती कोणत्याही रिक्रुटरसोबत शेअर करू नका. फेक जॉब ओळखण्याचा अजून एक मार्ग म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन नीट लिहिलेले नसणे. जॉब डिस्क्रिप्शनचे बेसिक स्ट्रक्चर आणि क्वालिटी डिसेंट असणे आवश्यक आहे. अपेक्षेपेक्षा अधिक पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची एक ट्रिक असते. कंपनी, कंपनीचे काम आणि पॅकेज याबद्दल अपुरी माहिती असणाऱ्या पोस्ट दुर्लक्षित केलेल्याच बऱ्या.

Web Title: online fraud of 8.21 lakh in the name of kbc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.