बतावणी करून ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:13+5:302021-06-10T04:10:13+5:30
अमरावती : ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक असल्याची बतावणी करून टेक्नोसर्ज इंडस्ट्रीजच्या मॅनेजरची २० हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही ...
अमरावती : ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक असल्याची बतावणी करून टेक्नोसर्ज इंडस्ट्रीजच्या मॅनेजरची २० हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
फिर्यादी महेश सुरेशलाल जयस्वाल (४६, रा. कैलासनगर) यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. संबंधित व्यक्तीने हिन्दुस्थान ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक असल्याची बतावणी केली. कंपनीतील वाॅटर टेस्टिंग किट अमरावती येथून गोरखपूर येथे पाठविण्यासाठी ट्रक पाठवितो, असे संबंधित व्यक्तीने महेश यांना सांगितले. यासाठी महेश यांनी फोन पेच्या माध्यमातून ॲडव्हान्स रक्कम पाठविली. परंतु, संबंधित व्यक्तीने ट्रक पाठविला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे महेशच्या लक्षात आले. या घटनेची तक्रार हरीश जयस्वाल यांनी बुधवारी सायबर ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी मोबाईल ॉधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस शहर सायबर पोलीस करीत आहेत.