महापालिकेत पर्यावरण रक्षणासाठी ऑनलाईन ‘हरित शपथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:51+5:302021-01-02T04:11:51+5:30

माझी वसुंधरा अभियान, महापौर, उपमहापौर, आयुक्तांचा सहभाग अमरावती : महापालिकेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी माझी वसुंधरा अभियानांतर्ग़त पर्यावरण ...

Online 'Green Oath' for Environmental Protection in Municipal Corporation | महापालिकेत पर्यावरण रक्षणासाठी ऑनलाईन ‘हरित शपथ’

महापालिकेत पर्यावरण रक्षणासाठी ऑनलाईन ‘हरित शपथ’

Next

माझी वसुंधरा अभियान, महापौर, उपमहापौर, आयुक्तांचा सहभाग

अमरावती : महापालिकेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी माझी वसुंधरा अभियानांतर्ग़त पर्यावरण रक्षणाच्‍या अनुषंगाने ऑनलाईन ‘हरित शपथ’ हा उपक्रम पार पडला. महापौर चेतन गावंडे यांच्‍या हस्‍ते ‘हरित शपथ’चे सामूहिक वाचन करण्‍यात आले.

निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्‍याच्या अनुषंगाने या अभियानामध्‍ये अंतर्भूत असलेल्‍या विविध घटकांसाठी महापालिकेतर्फे उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार महापालिकेच्या विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे, उपमहापौर कुसुम साहू, पक्षनेता सुनील काळे यांनी मार्गदर्शन केले. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीपासून हे अभियान सुरू झाले आहे. मनुष्‍य हा निर्सगाच्‍या सान्निध्‍यात आनंदी राहू शकतो. पण, आज पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. निसर्गाचे संवर्धन प्रत्‍येकाने करणे गरजेचे आहे. वसुंधरेप्रति आपली जबाबदारी म्‍हणून माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्‍या अनुषंगाने ‘हरित शपथ’ घेण्यात आल्याचे प्रास्ताविकातून सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन सहायक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी केले.

महिला बाल कल्‍याण समिती सभापती सुनंदा खरड, नगरसेवक अजय सारसकर, उपायुक्‍त अमित डेंगरे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, मुख्‍य लेखापरीक्षक राम चव्‍हाण, सहायक आयुक्‍त योगेश पिठे, विशाखा मोटघरे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ. सीमा नेताम, नगरसचिव मदन तांबेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, अभियंता श्‍यामकांत टोपरे, एस.एस. तिखिले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Online 'Green Oath' for Environmental Protection in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.