पोलीस पाल्यांसाठी रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:29+5:302021-06-18T04:10:29+5:30
( फोटो आहे. ) अमरावती : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त ...
( फोटो आहे. )
अमरावती : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पोलीस पाल्यांसाठी रोजगाराच्या संधी व तसेच रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविण्याच्या कार्यपद्धतीबाबत ऑनलाईन समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सहभाग नोंदविला.
केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनीसुद्धा यावेळी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कोरोनाकाळात ऑनलाईन व्यवसायातील रोजगार संधी वाढलेल्या असून, त्यानुरूप कौशल्य व अनुभव यांच्या माध्यमातून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात पोलीस पाल्यांनी उपलब्ध पदांकरिता आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहभाग नोंदवून रोजगार मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले. बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे व सदर मेळाव्याकरिता उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांकडील रिक्त पदांची माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.